Punjab CM Sakal
देश

Punjab: नव्या मुख्यमंत्र्यांनी दिली राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई

देशातील कापूस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दत्ता लवांडे

चंदीगड : पंजाबच्या नव्या मुख्यमंत्र्यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर लगेच कामाचा धडाका सुरु केलाय. प्रत्येक सरकारी कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंगाचे फोटो लावण्यापासून ते पंचवीस हजार नवीन सरकारी नोकऱ्यांची घोषणा किंवा भ्रष्टाचार रोखण्यासाठी सामान्य नागरिकांना हेल्पलाईन सुरु करण्यापर्यंत आणि आमदारांची पेन्शन रक्कम कमी करण्याचे निर्णय त्यांनी घेतले आहेत. त्यांनी आता कापूस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मदत केली आहे.

सध्या देशातील कापूस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच पंजाबमधील शेतकऱ्यांच्या कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना सरकारकडून देण्यात आली आहे. पंजाबमधील मानसा येथे मुख्यमंत्री भगवंत माण (CM Bhagwant Mann) यांनी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या कापूस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीचा चेक दिला आहे.

दरम्यान यावेळी बोलताना ते म्हणाले की, "लोकं प्रामाणिक आहेत, पण बदल घडायला काही वेळ लागेल. सगळे काम पूर्ण होतील आणि सगळं जग हे पंजाबचा विकास आणि क्रांती होताना बघेल." असं ते बोलताना म्हणाले. सध्या आप सरकारने पंजाबमदध्ये जोमाने कामाला सुरुवात केल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे.

आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे नवे मुख्यमंत्री भगवंतसिंग माण यांनी पंजाबमध्ये आता कामाला सुरुवात केली आहे. शपथ घेतल्यापासून त्यांनी जनतेच्या हितासाठी निर्णय अनेक घेतले. त्यामध्ये आमदारांसाठी आता एकाच वेळेच्या टर्मचे पेन्शन मिळणार आहे. तसेच भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारने एक हेल्पलाईन नंबर तयार केला आहे. तसेच देशात सर्वात मोठा प्रश्न असणाऱ्या बेरोजगारीवर त्यांनी पंचवीस हजार नोकऱ्या देण्याचे घोषित केले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन त्यांनी कापूस उत्पादकांना दिलासा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT