Bhagwant Mann Esakal
देश

पंजाबचे २५ वे मुख्यमंत्री होणार भगवंत मान; आज होणार शपथविधी

सकाळ डिजिटल टीम

चंडीगड: आम आदमी पक्षाची सत्ता पंजाबमध्ये पहिल्यांदाच आली आहे. निर्विवाद बहुमत मिळवत आम आदमी पक्षाने देशासमोर आपला करिश्मा सादर केला आहे. आपकडून मुख्यमंत्री पदाचे दावेदार असणारे भगवंत मान आता पंजाबचे २५ वे मुख्यमंत्री होणार आहेत. त्यांचा शपथविधी आज बुधवारी नवांशहरमध्ये सकाळी ११:30 वाजता सुरु होईल. पंजाबचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित त्यांना मुख्यमंत्री पदाची शपथ देतील. .या समारंभामध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासहित अनेक राजकीय नेते हजर राहणार आहेत.

या समारंभाला खास बनवण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. संपूर्ण पंजाबमधून दोन लाखांहून अधिक लोक येण्याची शक्यता व्यक्त केली जाात आहे. शहीद स्मारकाच्या मागे एक लाख लोकांच्या थांबण्याची व्यवस्था केली आहे. तर स्मारकेच्या जागेवर एक लाख लोकांच्या थांबण्याची व्यवस्था केली गेली आहे. स्मारकाच्या जागेवर साडेसहा एकर भागामध्ये मांडव घालण्यात आला आहे. या शपथविधीच्या आधीच भगवंत मान यांनी एक व्हिडीओ जाहीर करत लोकांना आमंत्रण दिलं आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटलंय की, "16 मार्च रोजी खटकर कलानमध्ये पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा होणार आहे. फक्त मीच नाही तर राज्यातील 3 कोटी लोकसंख्या माझ्यासोबत शपथ घेणार आहे. आम्ही सगळे स्वातंत्र्यसैनिक असलेल्या भगतसिंग यांचा वारसा एकत्रितपणे पुढे नेऊ. मी एकटा शपथ घेणार नाही. तुम्ही सर्वजण मुख्यमंत्र्यांची शपथ घ्या. हे तुमचे सरकार असेल." खटकर कलान हे भगतसिंग यांचं गाव आहे.

अशी आहे तयारी

या सोहळ्यासाठी आम आदमी पक्षाने जोरदार तयारी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा उद्या शपथविधी असल्यानं आज पंजाबमधील कोविड-१९ चे सर्व नियम मागे घेतले आहेत. भगवंत मान यांच्या शपथविधीदरम्यान विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. कार्यक्रमस्थळी विशेष चौक्या लावण्यात आल्या आहेत. यासोबतच सीआयडी आणि इतर गुप्तचर यंत्रणांची देखील या सोहळ्यावर पूर्ण नजर असणार आहे. या ऐतिहासिक शपथविधीसाठी राज्यातील कोविड-१९ चे निर्बंधांत शिथिलता देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : मराठी पत्रांना मराठीतच उत्तर देण्याचा केंद्राचा निर्णय

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT