Congress esakal
देश

India Alliance : इंडिया आघाडीत निवडणुकीआधीच मोठी फूट? पंजाब काँग्रेसचा मोठा निर्णय

पंजाब मधील लोकसभेच्या सर्व म्हणजेच 13 जागा पंजाब काँग्रेस स्वबळावर लढवणार आहे

रोहित कणसे

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली.मात्र या इंडिया आघाडीत लोकसभा निवडणूकीपूर्वीच मतभेद पाहायला मिळात आहेत. पंजाब काँग्रेस आप बरोबर कदापी युती करणार नाही असं स्पष्ट केलं आहे.

पंजाब काँग्रेस प्रभारी हरीश चौधरी यांची वरिष्ठ नेत्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर पंजाब काँग्रेसने आपसोबत कधीच युती करणार नाही असं सांगितलं आहे. पंजाब मधील लोकसभेच्या सर्व म्हणजेच 13 जागा पंजाब काँग्रेस स्वबळावर लढवणार आहे.

पंजाब काँग्रेसच्या या निर्णयामुळे विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत सर्व काही ठीक नसल्याचं चित्र आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीत असलेला इंडिया महायुतीसाठी हा विषय आणखी अडचणीचा ठरणार आहे. पंजाब काँग्रेसने आम आदमी पार्टीसोबत युती करण्यास नकार दिला देत पंजाबमधील सर्व 13 जागांवर लढवण्याचा निर्णय इंडिया आघाडीच्या भविष्यासाठी घातक ठरू शकतो.

आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात एकमत न होऊ शकल्याने इंडिया आघाडीमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचीच चर्चांना खतपाणी मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway Protest : शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातून पुन्हा एल्गार, सतेज पाटील, राजू शेट्टींच्या सोबतीने शेतकरी ताकद दाखविणार

Fan Safety Tips : घरातला पंखा ठरू शकतो धोकादायक! साधी चूक अन् घर जळून होईल खाक; उन्हाळा सुरू होण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' 2 गोष्टी

Mumbai Local: मुंबईकरांचा खोळंबा होणार, लोकलचे वेळापत्रक बदलणार, कोणत्या मार्गांवर आणि कधी? जाणून घ्या...

Pune Police Recruitment : पोलिस भरतीत ‘शॉर्टकट’चा स्फोट! शक्तीवर्धक पेय घेताच उमेदवाराचा मैदानावर धिंगाणा, थरारक क्षणांनी सर्वच शॉक

Bullet Rider Assaults Traffic Police in Solapur : लायसन्स, नंबरप्लेट नाही, मॉडिफाइड सायलेन्सर, तरीही पोलिसाला खल्लास करण्याची दिली धमकी

SCROLL FOR NEXT