Punjab Government esakal
देश

Punjab Government : NRI पंजाबी लोकांच्या तक्रारींसाठी सरकार राबवणार मोहीम, प्रश्न लवकरच लागणार निकाली

लोक ऑनलाईनही तक्रारी नोंदवू शकतात

Pooja Karande-Kadam

Punjab Government :

पंजाबी असलेल्या NRI असलेल्या लोकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी योजना राबवण्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे. ‘एन.आर.आय पंजाबिया नाल मिलनी’ असे या उपक्रमाचे नाव असल्याची माहिती अनिवासी भारतीय व्यवहार मंत्री कुलदीप सिंह धालीवाल यांनी सांगितले.

'एन.आर.आय, पंजाबिया नाल मिलनी'चे उद्घाटन 3 फेब्रुवारी रोजी पठाणकोट येथे करण्यात येईल. इथे, जिथे पठाणकोट, अमृतसर, गुरुदासपूर आणि होशियापूर इत्यादी जिल्ह्यांशी संबंधित स्थलांतरित पंजाबी लोकांच्या समस्या आणि तक्रारींचे निराकरण केले जाईल.

कॅबिनेट मंत्री म्हणाले की, ९ फेब्रुवारी रोजी एस.बी. एस. नगर (नवांशहर) येथील एस.बी. एस. नगर, रूपनगर, जालंधर, कपूरथला आणि एस.ए.एस नगर (मोहाली) आदी जिल्ह्यांत, तर १६ फेब्रुवारीला संगरूर, पटियाला, बर्नाला, फतेहगढ साहिब, मालेरकोटला, भटिंडा, लुधियाना आणि मानसा आदी जिल्ह्यांशी संबंधित स्थलांतरित पंजाबींचे प्रश्न सोडवले जातील.

तर, २२ फेब्रुवारी रोजी फिरोजपूर, फरीदकोट, फाजिल्का, तरनतारन, मोगा आणि श्री मुक्तसर साहिब या जिल्ह्यांचा समावेश केला जाईल. धालीवाल म्हणाले की, स्थलांतरित पंजाबी ११ जानेवारी ते ३० जानेवारी या कालावधीत विभागाच्या वेबसाइट आणि व्हॉट्सअॅप क्रमांक ९०५६०-०९८८४ वर त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात, अशी माहितीही मंत्री कुलदीप सिंह धालीवाल यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करून धालीवाल म्हणाले की, गेल्या वर्षी डिसेंबर २०२२ मध्येही राज्य सरकारने ५ यशस्वी मिलनी कार्यक्रमांचे आयोजन केले होते, त्यादरम्यान एनआरआय पंजाबींनी ६०५ वेगवेगळ्या तक्रारी केल्या होत्या, ज्यांचे निराकरण करण्यात आले आहे.

याशिवाय एन.आर.आय. पोलिस शाखेला सतत ऑनलाइन तक्रारी प्राप्त होत आहेत. या तक्रारींचे निवारणपंधरा आर.आय. पोलिस स्टेशन, जिल्हा प्रशासन आणि राज्य स्तरावर वेळेत समाधानकारक समाधान दिले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT