court e sakal
देश

... तर बालविवाह ग्राह्य धरला जाईल - HC

सकाळ डिजिटल टीम

पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने बालविवाहाबाबत दिलेल्या एका निकालाची सध्या चर्चा सुरु आहे.

पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने बालविवाहाबाबत दिलेल्या एका निकालाची सध्या चर्चा सुरु आहे. न्यायालयाने म्हटलं आहे की, वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याआधी लग्न झालेली मुलगी घटस्फोटाच्या माध्यमातून वेगळं राहण्यासाठी अर्ज करू शकते. मात्र जर मुलगीने वयाच्या १८ व्या वर्षी याचिकेच्या माध्यमातून लग्न अमान्य असल्याचं म्हटलं असेल तर हे शक्य नाही. न्यायाधीश रितु बाहरी आणि न्यायाधीश अरुण मोंगा यांच्या खंडपीठाने संबधित जोडप्याला परस्पर संमतीने घटस्फोट देण्यास नकार देणारा लुधियाना कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रद्द ठरवला. मुलीने जर १८ वर्षे वय झाल्यावर लग्न मान्य नसल्याबाबत याचिका दाखल केली नाही तर बालविवाह ग्राह्य धरला जाईल.

दरम्यान, या प्रकरणातील पुरुषाने मुलगी अल्पवयीन असताना तिच्यासोबत लग्न केलं होतं. लुधियानाच्या कौटुंबिक न्यायालयाने या प्रकरणी निर्णय देताना म्हटलं होतं की, मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असताना लग्न झाले असल्यानं हे लग्न वैध नाही. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात म्हटलं आहे की,'मुलीचं वय लग्नावेळी १७ वर्षे, ६ महिने आणि ८ दिवस इतकं होतं आणि तिच्याकडून लग्न मान्य नसल्याचं घोषित करण्यासाठी कोणती याचिका दाखल करण्यात आली नाही. त्यामुळे हिंदू विवाह अधिनियम १९५५ च्या कलम १३ नुसार घटस्फोटासाठी याचिका दाखल झाल्यानंतर वेगळे होण्यासाठी परवानगी द्यायला हवी होती.'

दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर परस्पर संमतीने घटस्फोट देण्यात आला. लुधियानातील या जोडप्याचे लग्न २७ फेब्रुवारी २००९ रोजी झाली होती. त्यावेळी पुरुषाचे वय हे २३ वर्षे होते. लग्नानंतर एक वर्षांनी त्यांना अपत्यसुद्धा झालं होतं.

गेल्या वर्षी २२ जून रोजी लुधियाना कौटुंबिक न्यायालयात जोडप्याने लग्न रद्द करण्यासाठी दोघांनी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने याचिका फेटाळून लावताना हिंदू विवाह कायद्याचा दाखला देत लग्न वैध ठरण्यासाठी मुलीचे वय १८ पेक्षा जास्त हवे असं सांगितलं होतं. मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत चुकीच्या पद्धतीने कौटुंबिक न्यायालयाने याचिका फेटाळल्याचं हायकोर्टाने म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: पहिल्या यादीत ५३३ शेतकऱ्यांना कर्जमाफी; सहकारमंत्र्यांची माहिती, प्राप्तिकर विभागाच्या माहितीअभावी विलंब

IPL परकीय चलन प्रकरणात ललित मोदींना १६ वर्षांनंतर आफ्रिकेतील न्यायालयाचा दिलासा; ईडीचा दंड रद्द

Latest Marathi Update : 'चलो संसद' आंदोलनामुळे दिल्लीतील १६ मेट्रो स्थानके आजही बंद; कडक सुरक्षा व्यवस्था

Pune Congress Protest: विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ पुणे काँग्रेस आक्रमक; मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी

अर्थपूर्ण पर्स : गरज आणि चैनीतला फरक ओळखा

SCROLL FOR NEXT