Marriage relationship 
देश

'21 वर्षांखालील मुलं लग्न करू शकत नाहीत, पण मुलींसोबत...' - हायकोर्ट

ओमकार वाबळे

मुलींच्या लग्नाचं किमान वय वाढवण्यावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. मुलांच्या लग्नाची वयोमर्यादा 18 वरून 21 करण्यात आली आहे. त्यामुळे काही राजकीय नेत्यांनीही आक्षेप घेतलाय. दरम्यान, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने नुकतेच एका प्रकरणात स्पष्टीकरण दिल्याने वादाला तोंड फुटू शकतं. मुलांच्या किमान लग्नाचं वय 21 आहे. त्यापेक्षा कमी वयाचा कोणताही तरुण लग्न करू शकत नाही, परंतु त्याचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असल्यास अशा मुलांबाबत कोर्टाने महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

मुलाचं वय 18 हून जास्त असल्यास तो कोणत्याही वायाच्या महिलेसोबत लिव्ह-इन मध्ये राहू शकतो. (Live In Relationship) संबंधित तरुणी अल्पवयीन नसावी. ही तरुणी मुलापेक्षा वयाने कितीही मोठी असली तरीही परस्पर सहमतीने दोघेही सोबत राहू शकतात.

उच्च न्यायालयाचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या मे 2018 च्या निर्णयाच्या संदर्भात आहे. ज्यामध्ये म्हटलं होतं की कोणतंही तरुण जोडपं लग्नाशिवाय एकत्र राहू शकतात. पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील एका तरुण जोडप्याने दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती.

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्याने या याचिकेद्वारे संरक्षणाची मागणी केली आहे. दोघांचेही वय १८ वर्षांहून अधिक आहे. तरुणाचे वय 18 आहे परंतु हिंदू विवाह कायद्यानुसार तो 21 वर्षांचा होईपर्यंत विवाह करू शकत नाही. त्यामुळे कायद्याच्या संरक्षणाची मागणी दोघांनी केली होती.

यानंतर तरुण जोडप्याने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात संरक्षणासाठी याचिका दाखल केली. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडून जीवाला धोका असल्याचे त्यांचे म्हणणं आहे. हे त्यांच्या नात्याबद्दल आहे. तरुण जोडप्याच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, त्यांना भीती वाटते की त्यांचे कुटुंबीय त्यांची हत्या करतील.

हायकोर्टातील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती हरनरेश सिंग गिल यांनी म्हटले आहे की, प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि जीवनाचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. तरुण जोडप्याच्या विनंतीवर निर्णय घेऊन त्यांना सुरक्षा पुरवण्याचे निर्देश न्यायाधीशांनी गुरुदासपूरच्या एसएसपीला दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT