Viral Video Sakal
देश

Viral Video: पोलिसांचा आरोपीवर फिल्मी स्टाईल गोळीबार; घटना CCTVमध्ये कैद

सकाळ डिजिटल टीम

चंदीगढ : आज सकाळी पंजाबमधील पोलिसांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये पंजाबच्या फिरोजपूर येथे पोलिस आरोपींच्या एका कारचा फिल्मी स्टाईल पाठलाग करताना दिसत आहेत. पांढऱ्या रंगाच्या एका स्विफ्ट डिझायर कारचा पाठलाग पोलिस करत असून पोलिसांनी या गाडीवर गोळीबारही केला आहे. या सगळ्या झटापटीनंतर पोलिसांनी दोघांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

(Punjab Police Firing Viral Video)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्सची तस्करी करणाऱ्या आरोपींचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता. रस्त्यावर नाकाबंदी सुरू असताना आरोपीला संशय आल्यावरून त्यांनी तेथून पळ काढला पण पोलिसांनी त्यांचा फिल्मी स्टाईल पाठलाग केला. बराच पाठलाग करूनही पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश न आल्याने त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. अखेरीस आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून १० ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. त्याचबरोबर अधिकचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT