Punjab Politics
Punjab Politics  Team eSakal
देश

बैठकीत काय घडलं? ज्यामुळे सिद्धू ऐवजी चन्नी झाले मुख्यमंत्री

सुधीर काकडे

पंजाबचे मुख्यमंत्री कॅपट्न अमरिंदर सिंग (Amrinder Singh) यांनी राजीनामा दिला आणि पंजाबमध्ये (Punjab) मोठा राजकीय भुकंप झाला. विधानसभेच्या निवडणूका तोंडावर असताना मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे पक्षातील अंतर्गत गटबाजी समोर आलीच, मात्र नवा मुख्यमंत्री निवडण्याचा अवघड पेच पक्षासमोर निर्माण झाला. मागच्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक असलेले नवज्योत सिंह सिद्धू, सुनील जाखड, सुखजिंदर रंधवा या काही प्रमूख लोकांची नावं मुख्यमंत्री पदासाठीच्या चर्चेत आली आणि सुरुवात झाली एका राजकीय नाट्याला.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अरमरिंदर सिंग यांनी १८ सप्टेंबरला राजीनामा दिला आणि हाय होल्टेज ड्रामानंतर २० सप्टेंबरला चरणजीतसिंग चन्नी यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या संपुर्ण कालावधीत अवघ्या देशाचं लक्ष पंजाबमध्ये घडणाऱ्या राजकीय घडामोडींवर होतं. मुख्यमंत्री पदासाठी सुरुवातीला अंबिका सोनी आणि सुखजिंदर सिंग रंधवा यांच्या नावाची चर्चा होती. त्यातच सोनी यांनी मुख्यमंत्रीपदासाठी नकार दिल्यानंतर रंधवा यांचं नाव जवळपास निश्चितच मानलं जात होतं. मात्र त्यांचंही नाव बाजूला सारत काँग्रेसने मुख्यमंत्री पादासाठी एक नवा चेहरा दिला.

सुनील जाखड यांचं नाव चर्चेत आलं...

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणाऱ्या वेगवेळ्या नावांमध्ये सुखजिंदर सिंग रंधवा आणि प्रतात सिंग बाजवा यांच्यावर पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष सुनील जाखड यांचं नाव होतं. अमरिंदर यांच्या हिंदू मतदाराला घाबरवण्याच्या सततच्या प्रयत्नांना विरोध करण्यासाठी सुनील जाखड हे एक हिंदू मुख्यमंत्री होतील म्हणून नवजोत सिंग सिद्धू यांचा देखील त्यांना पाठिंबा होता. सुनील जाखड यांचं नाव चर्चेत येताच काही नेत्यांनी आक्षेप घेतला आणि सांगितलं की, जाखड हे आमदार नाहीत. त्यामुळे ते जर मुख्यमंत्री झाले तर, त्यांना पुढच्या वर्षी निवडणूक लढवावी लागेल. त्यामुळे त्यांचं नाव या चर्चेतून बाजूला सारलं गेलं.

अंबिका सोनींनी का नकारली मुख्यमंत्रीपदाची ऑफर ?

जाखड यांच्या नंतर शनिवारी रात्री उशिरा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आलं. त्यांच्या नावावर जवळपास एकमत झालं आणि त्याच पंजाबच्या मुख्यमंत्री होतील अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र सोनी यांनी त्वरीत राहुल गांधींची भेट घेतली आणि पक्षाची ऑफर नाकारली. पंजाबचा मुख्यमंत्री हा शीख असावा यावर आपण ठाम असल्याचं त्यांनी पक्षाला सांगितलं. त्यांच्या या भुमिकेनंतर त्यांचं देखील बाजूला झालं.

सोनी यांच्या नकारामुळे पुन्हा एकदा पक्षांतर्गत गटबाजीला सुरुवात झाली. रविवारची सकाळ सिद्धू आणि रंधावा यांच्या नावाच्या चर्चेनं झाली. द प्रिंट ने दिलेल्या वृत्तानुसार जाट शीख असणाऱ्या दोघांमध्येही खुर्चीसाठी जोरदार वाद सुरू झाला, असे एका आमदाराने सांगितले. अमरिंदर यांच्याविरोधात जवळपास 40 आमदारांना एकत्र करण्यात यश मिळवल्यापासून रंधवा देखील मुख्यमंत्री होण्याच्या महत्त्वाकांक्षा बाळगून होते. दोघांनीही एकमेकांच्या नावाला विरोध केला.

दरम्यान, रंधवा यांना नवज्योत सिंह सिद्धू यांच्यापेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा आहे, त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री करावं अशी मागणी काही लोकांनी केली असता, सिद्धू हे बैठक सोडून बाहेर गेले असेही समजते आहे. रंधवा यांच्या नावाची चर्चा सुरु असतानाच काही आमदार त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले.

चरणजीत सिंग चन्नी यांचं नाव कसं समोर आलं?

सर्व घडामोडी सुरु असतानाच बैठकीत राज्याच्या अर्थमंत्री मनप्रीत सिंग बादल यांनी एक महत्वाची भूमिका मांडली आणि त्यानंतर पंजाबचा मुख्यमंत्री निवडला गेला. "मनप्रीत यांना अकाली दलाचं राजकारण चांगल्या प्रकारे समजतं आणि अकाली दल आणि बसपा दलित मुख्यमंत्री देऊ असे म्हणून मतं मिळवतील त्यामुळे त्यांनी दलित मुख्यमंत्र्याचा विचार करावा अशी विनंती काँग्रेस हाय कमांडला केली” अशी माहीती काँग्रेसच्या एका नेत्याने दिली.

त्यानंतर काँग्रेसकडून मोठा निर्णय घेतला गेला आणि रंधवा यांच्या घरी पुष्पगुच्छ घेऊन त्याचं अभिनंदन करण्यासाठी उभे असलेल्या चन्नी (Charanjit singh Channi) यांच्या नावाची घोषणा हरीश रावत यांनी केली आणि सर्वांना धक्का बसला. मुख्यमंत्री पदासाठी निवडल्या गेलेले चन्नी हे प्रथम रावत यांच्यासोबत मुख्यमंत्री पदाचा दावा करण्यासाठी राज्यपालांच्या घरी गेले. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर चन्नी यांनी लगेचच मनप्रीत यांची देखील भेट घेतली.

सिद्धू यांच्या समोर जेव्हा चन्नी यांचं नाव आलं, तेव्हा त्यांनी या नावाला समर्थन दिलं. एक ताकदवान जाट शीख मुख्यमंत्री बनला तर तो निवडणुकीनंतरही मुख्यमंत्रिपदावर दावा करेल या भितीने सिद्धू यांनी चन्नी यांच्या नावाला समर्थन केलं.

पंजाबमध्ये अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर चरणजीत सिंग चन्नी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चरणजीत हे पंजाबचे १६ वे मुख्यमंत्री ठरले आहेत. तर पहिल्यांदाच राज्याला दलित समुदायातील मुख्यमंत्री मिळाला आहे. पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार असून त्याआधीच राज्यात मुख्यमंत्री बदलण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

घर का न घाट का... उन्मुक्त चंदच ड्रीम झालं उद्ध्वस्त! गुजराती खेळाडू बनला World Cupमध्ये अमेरिकन संघाचा कर्णधार

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT