Punjab Polls: Conjoined twins cast their votes in Amritsar
Punjab Polls: Conjoined twins cast their votes in Amritsar टिम ई सकाळ
देश

एक जिस्म दो जान; गोपनियेतेच्या अटीवर केल एकत्र मतदान

सकाळ डिजिटल टीम

‘दो जिस्म एक जान’ हे आपण नेहमीच ऐकलंय. पण तुम्ही कधी एक जिस्म दो जान ऐकलंय का? सध्या या गोष्टीचा प्रत्यय देणारे शारीरिक दृष्ट्या जुळ्या भावांची पंजाब विधानसभा निवडणुकीच्या (Panjab Assembly Election) पार्श्वभूमीवर जोरदार चर्चा सुरू आहे. आज त्यांनी मतदान (Vote) केले पण शरीराने जुळ्या असणाऱ्या या भावंडाने मतदान केले तरी कसे?

आज पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. अमृतसरचे (Amritsar) शारीरिकदृष्ट्या जुळे भाऊ सोहना (Sohna) आणि मोहना (Mohna) यांनी आज मतदान केले. अमृतसरमधील मतदान केंद्रावर अधिकाऱ्यांनी या जुळ्या भावंडाचे स्वागत केले.

पीआरओ गौरव कुमार यांनी सांगितले की, ही खूप वेगळी बाब आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission)आम्हाला योग्य पद्धतीने व्हिडिओग्राफी करण्यास सांगितले होते. ते शारीरिकदृष्ट्या जोडलेले आहेत, परंतु दोघांचे मतदार वेगळे आहेत. दोघांनी मतदानाची गुप्तता राखावी म्हणून आरओने त्यांना चष्मा देण्याची व्यवस्था केली होती.

सोहना आणि मोहना या जुळे भावंडाना यांना गेल्या वर्षी सरकारी नोकऱ्या (Government Job) मिळाल्या होत्या. सोहना आणि मोहना पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (PSPCL) मध्ये काम करतात. एका अधिकाऱ्याने सांगितले की, १९ वर्षीय सोहनाला नोकरी मिळाली आणि त्याने २० डिसेंबर २०२१ रोजी काम सुरू केले. तो मोहनासह पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमधील विद्युत उपकरणांची काळजी घेतो.

या शारीरिकदृष्ट्या जुळ्या भावांचा जन्म १४ जून २००३ रोजी नवी दिल्ली येथे झाला. जन्मानंतर, सोहना आणि मोहना यांना त्यांच्या पालकांनी सोडून दिले होते त्यानंतर त्या दोघांना दिल्लीतील एम्समध्ये (AIIMS) नेण्यात आले. शस्त्रक्रियेत अडचणी येऊ शकतात म्हणून एम्सच्या डॉक्टरांनी दोघांना वेगळे करण्याचा निर्णय सोडून दिला होता, त्यामुळे दोघांना वेगळे करण्यात आले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : Lok Sabha Election 2024 : जाणून घ्या 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT