Sandeep Thapar 
देश

Crime: शिवसेना नेत्यावर जीवघेणा हल्ला, भर रस्त्यात तलवारीने सपासप वार; शहीद सुखदेव यांचे आहेत नातेवाईक

Punjab Shiv Sena leader Sandeep Thapar: भर रस्त्यात त्यांच्यावर सपासप वार करण्यात आले. संदीप थापर यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कार्तिक पुजारी

चंदीगड- पंजाबच्या लुथियानामध्ये शहीद सुखदेव सिंह यांचे नातेवाईक आणि शिवसेनेचे (पंजाब) नेता संदीप थापर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. निहंगांनी (सशस्त्र शीख योद्धे किंवा अकाली ) त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. भर रस्त्यात त्यांच्यावर सपासप वार करण्यात आले. संदीप थापर यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

संदीप थापर सिविल हॉस्पिटलमध्ये आयोजित एका कार्यक्रमासाठी याठिकाणी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते बाहेर आले. तेव्हा त्यांची वाट पाहात बसलेले ३-४ निहंगांनी त्यांच्यावर हल्ला केला. सदर घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. त्यांना सिविल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची स्थिती गंभीर असल्याचं कळतंय. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

सोशल मीडियावर यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात तीन लोक स्कुटीवर आलेले दिसत आहेत. रस्त्यावर गर्दी आहे. अशावेळी आरोपी तलवार काढून थापर यांच्यावर हल्ला करतात. त्यांच्यावर चार-पाच वेळा सपासप वार केले जातात. रस्त्यावरील काही लोक आरडाओरड करतात. अशावेळी तीन लोक स्कूटीवर बसून निघून जातात. सदर व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे.

माहितीनुसार, थापर हे खलिस्तान विरोधात बोलत असतात. त्यांनी पंजाबमधील शेतकरी आंदोलनाविरोधात देखील भाष्य केलं होतं. ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा गनमॅन देखील होता. पण, त्याचे शस्त्र हिसकवण्यात आले होते. थापर यांच्या निटकर्तीयांच्या माहितीनुसार, गेल्या काही काळापासून त्यांना धमकी मिळत होते. त्यामुळे त्यांना एक अंगरक्षक देण्यात आला होता.

याप्रकरणी अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. आरोपींना पकडण्यासाठी टीम स्थापन करण्यात आली आहे. कोणालाही सोडण्यात येणार नाही असं पोलिसांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT