देश

लाल किल्ला हिंसाचारातील प्रमुख आरोपी दीप सिद्धूचा अपघातात मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : तीन कृषी कायद्याच्या निषेधार्थ राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारानंतर प्रसिद्धीझोतात आलेला प्रसिद्ध पंजाबी अभिनेता दीप सिद्धू यांचं निधन झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिंघू सीमेजवळ कुंडली मानेसर हायवेवर झालेल्या अपघातात दीप सिद्धूचा मृत्यू झाला आहे. दीप सिद्धू आपल्या साथीदारांसह दिल्लीहून पंजाबला परतत असताना हा अपघात झाला.

दीप सिद्धू आपल्या साथीदारांसह स्कॉर्पिओमधून जात होता. या अपघातात स्कॉर्पिओ कार ट्रॉलीला धडकली. खरखोडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनात तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता. 26 जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारातील तो प्रमुख आरोपी होता. मात्र, नंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. दीप सिद्धूच्या निधनाची बातमी कळताच पंजाबी सिनेजगतात शोककळा पसरली आहे. या बातमीने त्याचे चाहते हळहळ व्यक्त केली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी दीप सिद्धू यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. चरणजीत चन्नी यांनी ट्विट करून लिहिलंय की, सुप्रसिद्ध अभिनेता आणि समाजसेवक दीप सिद्धू यांच्या निधनाने खूप दुःख झालं आहे. माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

मालमत्ता ४ कोटींची, मग १३ कोटींची रोल्स रॉयस कुठून आली? मैथिली ठाकूरच्या व्हिडीओवरून CAचा सवाल, चौकशीची मागणी

Bihar viral video case: जमुई अल्पवयीन मुलीचं छेडछाड प्रकरण! राष्ट्रीय महिला आयोग आक्रमक, पोलीस महासंचालकांना कठोर निर्देश

Lohara Crime : पतीने धारदार शस्त्राने वार करून पत्नीचा केला खून; हल्ल्यानंतर पतीने स्वतःवर वार करून पोलिस ठाण्यात झाला हजर

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT