Punjabi singer Mankirt Aulakh demands security cover after Sidhu Moosewala murder  
देश

सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर आणखी एका पंजाबी गायकाने मागितली सुरक्षा

सकाळ डिजिटल टीम

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येच्या काही दिवसांनंतर, आणखी एक पंजाबी गायक मनकीरत औलख यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औलख यांना एप्रिलमध्येही अशाच प्रकारे जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या.

दविंदर बंबीहा टोळीकडून मिळालेल्या धमक्यांमुळे गायक औलख यांनी पंजाब पोलिसांकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. पंजाबी गायक आणि राजकारणी सिद्धू मुसेवाला यांची रविवारी, २९ मे रोजी मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली.

कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रारने मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीशी जवळचे संबंध असलेल्या ब्रारने एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, गँगस्टर विकी मिद्दूखेरा याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याने मुसेवालाची हत्या केली होती.

पंजाब पोलिसांच्या डॉजियरनुसार, गोल्डी ब्रारचे पूर्ण नाव सतविंदरजीत सिंग आहे. तो A+ श्रेणीचा गुंड आहे आणि न्यायालयाने त्याला फरार घोषित केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्स तुरुंगात गेल्यानंतर गोल्डी ब्रारने टोळीची कमान हाती घेतली होती. लॉरेन्स बिश्नोई आणि दविंदर बंबीहा यांच्या टोळ्या आणि साथीदार पंजाबमध्ये गँग वॉरमध्ये गुंतले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Silver New Rule: चांदीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय! आयात शुल्क वाढीनंतर आता नवा नियम लागू; किमती वाढणार?

पुण्यात २५ वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन, अधिक मासात अंगठी, फ्लॅटसाठी ३ लाखाची मागणी; सासरच्यांवर गंभीर आरोप

'मी कधीच कुणाचं ऐकत नसते' प्राजक्ता माळीने PM मोदींचही न ऐकता आपलंच खर केलं, नक्की काय झालं?

Latest Marathi News Live Update : म्यानमार राष्ट्राध्यक्षांची मुंबई विमानतळाला भेट

Maharashtra Police: एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त, महाराष्ट्र पोलिसांचा दणका; २० कोटींचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT