Jagannath Temple sakal
देश

Puri Jagannath Temple : परिक्रमा प्रकल्पामुळे जगन्नाथ मंदिराचा कायापालट; रथयात्रेचा मार्गही मोकळा

चारधाममधील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या पुरीच्या जगन्नाथ मंदिराला आता भाविकांना विनाअडथळा प्रदक्षिणा घालता येणार आहे.

स्मृती सागरिका कानुनगो - सकाळ न्यूज नेटवर्क

पुरी (ओडिशा) - चारधाममधील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या पुरीच्या जगन्नाथ मंदिराला आता भाविकांना विनाअडथळा प्रदक्षिणा घालता येणार आहे. परिक्रमा प्रकल्पाअंतर्गत लोकवस्ती, दुकाने, मठ आणि लॉज यांनी विळखा पडलेल्या जगन्नाथ मंदिराने आता मोकळा श्वास घेतला आहे. रथयात्रा मार्गही मोकळा करण्यात आल्यामुळे तिथे एकाच वेळी लाखो भाविकांना दर्शनाचा लाभ घेत येईल. ओडिशा सरकारच्या श्रीमंदिर परिक्रमा प्रकल्पाचे बुधवारी (ता. १७) विधिवत उद्‍घाटन होणार आहे.

अशीही वैशिष्ट्ये

  • मंदिर परिक्रमेचा परिसर आता २६ एकर जागेत साकारला आहे

  • सुमारे ८०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पात मार्गाचे सौंदर्यीकरण

  • मंदिरात रोज होणारा झेंडा बदलण्याचा सोहळा आता मंदिराबाहेरूनही पाहता येणार

मंदिर परिक्रमा मार्गात पूर्वी अनेक अडथळे येत असत. आता मात्र देव आणि भाविकांच्या मध्ये कोणीही नाही. त्यामुळे शांतपणे, सद्‍भावनेने ही परिक्रमा पूर्ण करता येते. या परिसरात एक प्रकारे सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

- महंत नारायण रामानुज दास, मठाधिपती

परिक्रमा प्रकल्पाची व्याप्ती मोठी असल्याने मोठ्या प्रमाणावर लोकांचे विस्थापन करावे लागणार होते. मात्र त्यांना योग्य मोबदला देऊन सरकारने हे काम कमी वेळेत पूर्ण केले.

- समर्थ वर्मा, जिल्हाधिकारी, जगन्नाथपुरी यांनी दिली.

भुवनेश्‍वर - जगन्नाथपुरी येथील श्रीमंदिर परिक्रमा प्रकल्पाचा लोकार्पण समारंभ बुधवारी (ता.१७) रोजी होणार आहे. यासाठी श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने (एसजेटीए) सर्व तयारी पूर्ण केली आहे. उद्‍घाटन समारंभासाठी निमंत्रित म्हणून मंदिरे आणि पाहुण्यांना निमंत्रणे पाठविली असून देशभरातून आणि परदेशातून लाखो भाविक येण्याची अपेक्षा आहे.

देशभरातील ८५७ मंदिरांचे प्रमुख पदाधिकारी, चारधामचे शंकराचार्य आणि नेपाळच्या राजाचा निमंत्रितांमध्ये समावेश आहे. ओडिशा आणि इतर राज्यांमधील ७४६ जगन्नाथ मंदिरे आणि १११ अन्य धार्मिक स्थळांना निमंत्रण पत्रिका पाठविले आहे. लोकार्पण सोहळ्यानिमित्त ‘म्युनिसिपालिटी मार्केट’मध्ये एक लेसर शोचे आयोजन केले जाणार आहे.

त्यात कांचीच्या गौरवशाली इतिहासाची कथा सांगितली जाणार आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी येत्या १७ रोजी राज्यात सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. या दिवशी सर्व सरकारी कार्यालये आणि शाळा-महाविद्यालये बंद राहणार आहेत.

परिक्रमा प्रकल्पासाठी यज्ञ

श्रीमंदिर परिक्रमा प्रकल्पाच्या उद्‍घाटनानिमित्त आजपासून महायज्ञाला सुरुवात झाली आहे. पुरीतील परिक्रमा परिसरात सूर्यदेवाच्या उपासनेने महायज्ञाची सुरुवात झाली. त्यानंतर यज्ञमंडप प्रदक्षिणा, तोरम पूजा, द्वारपाल पूजा आणि ध्वजपूजा करण्यात आली. मकरसंक्रांत असल्याने शेकडो भाविक जगन्नाथाच्या दर्शनासाठी आले होते.

गेल्या चार वर्षांपूर्वी जगन्नाथ मंदिराच्या सीमेबाहेर कचऱ्याचे ढीग दिसत असत. मंदिराच्या सुरक्षेचेही समस्या होती. मंदिर परिसराचा कायापालट करण्यासाठी राज्य सरकारने २०१९ मध्ये सुधारणा प्रकल्प हाती घेतला. आता या मंदिराभोवती ७५ मीटर विस्तृत प्रदक्षिणा (परिक्रमा) मार्ग बांधण्यात आला आहे. मार्गावर भाविकांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.

प्रकल्पाचे स्वरूप

  • मूलभूत सुविधा आणि वारसा व स्थापत्य कला विकास (एबीएडीएचए) योजनेअंतर्गत ४,२२४.२२ कोटी रुपयांचा विस्तारित प्रकल्प

  • पुरीला जागतिक वारसा शहरामध्ये रूपांतरित करण्याचा नवीन पटनाईक सरकारचा प्रयत्न

  • पुरीचे राजे गजपती दिव्यसिंह देव यांच्या हस्ते १४ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रकल्पाचे भूमिपूजन

  • सात मीटरचे क्षेत्र संरक्षित

  • भाविकांसाठी मंदिरात दहा मीटरचा प्रदक्षिणा मार्ग

  • जगन्नाथ संस्कृतीशी निगडित असलेल्या वनस्पतींचा समावेश असलेल्या उद्यानाची उभारणी

नारणगड आणि गोविंदपूर येथील खाणींमधील खोंडलाईट दगडाच्या वापर आणि कलिंग शैलीत तयार झालेला हा प्रकल्प वास्तुशास्त्रीयदृष्ट्या अद्वितीय आहे. स्थानिक संस्कृतीचे प्रतिबिंब यात पडले आहे. विस्तारित मार्ग तयार करण्याबरोबरच १०० मीटर त्रिज्येतील २१ मठांचा सांस्कृतिक वारसा जतन करण्याचेही या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

- रंजन दास, प्रमुख, श्री जगन्नाथ मंदिर प्रशासन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT