Puri Rath Yatra 
देश

पुरीत भाविकाना नो एंट्री; दर्शनासाठी न येण्याचे प्रशासनाकडून आवाहन 

पीटीआय

भुवनेश्‍वर - सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर पुरीत ऐतिहासिक जगन्नाथ यात्रेला मंगळवारी सुरवात झाली. मात्र यादरम्यान भाविकांनी दर्शनासाठी पुरीला येऊ नये, असे आवाहन ओडिशा पोलिसांनी केले आहे. सोशल डिस्टिन्सिंगचे पालन व्हावे आणि कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये यासाठी पुरी जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय योजले जात असून, भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कालपासून ऐतिहासिक जगन्नाथ यात्रेला सुरवात झाली. ही यात्रा नऊ दिवस चालणार आहे. सध्या भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि त्यांची बहीण सुभद्रा हे सध्या आपापल्या रथांवर विराजमान आहेत. त्यानंतर त्यांना श्री गुंडीचा मंदिराच्या आत नेण्यात येणार आहे. परंतु मंदिर आणि रथाच्या परिसरात भाविकांना येण्यास परवानगी नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मंदिर आणि रथ परिसरात चेंगराचेंगरी, गर्दी टाळण्यासाठी शहरातील काही भागात निर्बंध लावण्यात आले आहेत. ओडिशाचे पोलिस महासंचालक अभय म्हणाले की, पुरी जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचा आदेश मागे घेतला असला तरी काही भागात सुरक्षा दल कायम ठेवण्यात आले आहे. काही भागात संचारबंदी लागू असून भाविकांनी पुरी शहराला जाण्याचे टाळावे, असे आवाहन अभय यांनी केले आहे. भाविकांना तिन्ही रथांचे दर्शन घेता येणार नाही, असा पुनरुच्चार अभय यांनी ट्विटरवरून केला आहे. दरम्यान, पुरीचे जिल्हाधिकारी बलवंत सिंह यांनी पुरी शहरातील काही भाग बंद असून नागरिकांवरचे निर्बंध मात्र शिथिल करण्यात आले आहेत. श्री गुंडीचा मंदिराजवळ रथ असेपर्यंत सुरक्षा दल कायम राहील, असे त्यांनी नमूद केले. पुरी शहरातील बडसनखा ते मतिपाडा स्थानकापर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र संपूर्ण जिल्ह्यात निर्बंध नसतील, असेही त्यांनी सांगितले. तत्पूर्वी पुरी रथयात्रेदरम्यान परजिल्ह्यातील नागरिक आणि वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही, असे सांगण्यात आले होते. त्यासाठी २४ जूनपर्यंत पुरी जिल्ह्यात संचारबंदीही लागू केली होती. 

रथयात्रेची बारा तासातच तयारी 
सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर बारा तासांतच जगन्नाथ यात्रेची तयारी पूर्ण केल्याचे मुख्य सचिव ए. के. त्रिपाठी यांनी सांगितले. काल रथयात्रा सुरळीत आणि शांततेत पार पाडल्याबद्दल भाविकांचे आभार मानले आणि प्रशासनाचे कौतुक केले. तिन्ही रथयात्रा गुंडीचा मंदिरात वेळेपूर्वीच पोचल्याचे त्यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! आता प्रत्येक शिक्षकाचे स्वतंत्र प्रोफाईल तयार होणार; माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय; एका क्लिकवर मिळणार ३ लाख शिक्षकांचा बायोडाटा

Panchang 24 March 2026: आजच्या दिवशी ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण आणि ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

आजचे राशिभविष्य - 24 मार्च 2026

Pune News: औषधोपचाराने ‘एमडीआर’ क्षयरोगावर मात; मृत्युदर घट, बरे होण्याचे प्रमाण वाढले

इनर इंजिनिअरिंग : आपल्यातील सर्वोच्च शक्ती

SCROLL FOR NEXT