QR Code Scam esakal
देश

QR Code Scam : ऑनलाइन पेमेंट करताय? सावधान, एक चूक अन् अकाउंट होइल रिकामं

सध्या QR Code Scam फार वेगात पसरत आहे. नीट काळजी घेतली नाही तर तुमच्या अकाउंटमधून पण पैसे कट होऊ शकतात.

सकाळ डिजिटल टीम

QR Code Scam : सध्या QR Code Scam फार वेगात पसरत आहे. नीट काळजी घेतली नाही तर तुमच्या अकाउंटमधून पण पैसे स्कॅमरच्या अकाउंटमध्ये जाऊ शकतात. याधीपण सिक्युरिटी रिसर्च फर्मने याविषयी तक्रार केली आहे.

हा स्कॅम नवा नाही. OLX वर पण बऱ्याचदा लोक या स्कॅममध्ये अडकतात. नुकतीच एक महिला यात अडकली आहे. स्कॅमरने दिलेल्या किमतीत वस्तू खरेदी करण्याची तयारी दाखवली. त्याचं पेमेंट ऑनलाइन करण्यासाठी त्याने QR Code पाठवला. पेमेंट रिसिव्ह करण्यासाठी फोन पे किंवा जी पे कोड स्कॅन करून यूपीआय पीन एंटर करावा लागतो.

असं केल्याबरोबर महिलेच्या अकाउंटमधून पैसे कट झाले. त्यामुळे तिने सायबर क्राइममध्ये तक्रार केली. याशिवाय अजून एका पध्दतीने स्कॅम केला जातो. यात सार्वजनिक ठिकाणी जसं की, पेट्रोल पंपावर स्कॅन करताना त्या कोडवर स्कॅमर आपला कोड लावतात. असं केल्याने स्कॅमरकडे पैसे जातात. आणि आपल्याला फार उशीरा समजतं.

अशी घ्या काळजी

  • कोणत्याही दुकानात पेमेंट करताना QR Code स्कॅन करताना एकदा व्हेरीफाईड नाव बघून कंफर्म करा.

  • जर कोणता QR Code स्कॅन केल्यावर अनोळख्या वेबसाइटवर रिडायरेक्ट केलं जात असेल तर सावध व्हा.

  • कोणत्याही पेमेंटला रिसिव्ह करण्यासाठी युपीआय पिन एंटर करण्याची आवश्यकता नसते.

  • त्यामुळे जर कोणी पेमेंट सेंड करण्याऐवजी QR Code स्कॅन करायला सांगत असेल तर ताबोडतोब साइबर क्राइमला तक्रार करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime News : कोल्हापुरात विकृती वाढतेय! दागिन्यांसाठी नातवाने आजीला चहातून विष पाजलं; पोलिसांनी अवघ्या काही तासात लावला छडा

‘भूत बंगला’मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार मिथिला पालकर; साकारणार 'ही' भूमिका

Terrorist Junaid Ahmad : तुरुंगातील कैद्यांना भडकवणारा मास्टरमाईंड अद्याप मोकाट! दहशतवादी जुनैद अहमदला पकडण्यासाठी NIA कडून पाच लाखांचे रोख बक्षीस जाहीर

High Court Nagpur Bench: सासरच्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा वाढता ट्रेंड; नागपूर खंडपीठाचा कडक इशारा! काय होतं प्रकरण?

Kolhapur Foundries : कोल्हापुरात ‘ग्रीन कास्टिंग’चा पथदर्शी प्रकल्प; पश्चिम विभागाचे अध्यक्ष वीर अडवाणी, फाउंड्रीतील निर्यात वाढणार

SCROLL FOR NEXT