Queen Elizabeth-2 Death pm narendra modi told a special story esakal
देश

Queen Elizabeth यांनी जपून ठेवलेलं गांधीजींचं खास गिफ्ट; PM मोदींनी सांगितला किस्सा

धनश्री ओतारी

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी रात्री (भारतीय वेळेनुसार) निधन झाले. त्या ९६ वर्षांच्या होत्या. त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. एलिझाबेथ द्वितीय यांची तब्येत नाजूक असल्याचं याआधीच बकिंघम पॅलेसकडून सांगण्यात आलं होतं. एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी महात्मा गांधीजींनी एलिझाबेथ द्वितीय यांना दिलेल्या खास भेटीचा किस्सा भारतीय जनतेला शेअर केला आहे.(Queen Elizabeth-2 Death pm narendra modi told a special story)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणीसोबतच्या भेटीचे फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. ''2015 आणि 2018 मध्ये माझ्या यूके दौऱ्यात राणी एलिझाबेथ II सोबत माझ्या संस्मरणीय भेटी झाल्या. त्यांची कळकळ आणि दयाळूपणा मी कधीही विसरणार नाही. एका भेटीत त्यांनी मला महात्मा गांधींनी त्यांच्या लग्नात भेट म्हणून दिलेला रुमाल दाखवला.'' असा किस्सा त्यांनी एका ट्विटमध्ये सांगितला आहे.

तर दुसऱ्या ट्विटमध्ये, ''महाराणी एलिझाबेथ II या आमच्या काळातील दिग्गज म्हणून स्मरणात राहतील. त्यांनी आपल्या देशाला आणि लोकांना प्रेरणादायी नेतृत्व दिलं. सार्वजनिक जीवनात त्यांनी प्रतिष्ठा आणि सभ्यता दाखवली. त्यांच्या निधनाने मी दुखावलो आहे.'' अशा शब्दात शोक व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election : निवडणूक प्रचारासाठी गजानन मारणेला पुण्यात प्रवेश; उच्च न्यायालयाची सशर्त परवानगी!

Ayurvedic Warning: दह्यासोबत 'हे' 5 पदार्थ खाल्ल्यास पोटात तयार होतं विष, वेळीच व्हा सावध

Pune municipal corporation election: पुण्यात भाजप उमेदवाराला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न; भीमनगर परिसरातील घटना

Latest Marathi News Live Update : धुळे महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराचा फाडला बॅनर

Ichalkaranji Election : वस्त्रोद्योगाच्या प्रश्नांना गती देण्याचे आश्वासन; इचलकरंजीत आवाडेंची ठाम भूमिका

SCROLL FOR NEXT