Sonia Gandhi  esakal
देश

Sonia Gandhi : रायबरेलीच्या मतदारानों, माझ्या कुटुंबालाही सांभाळा; सोनिया गांधी यांचे भावनिक पत्र

रायबरेलीच्या मतदारांनी अत्यंत कठीण काळात माझी साथ सोडली नाही. आता प्रकृतीमुळे मी निवडणूक लढवू शकत नाही. परंतु आगामी काळात माझ्या कुटुंबाला तुम्ही सांभाळा.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - रायबरेलीच्या मतदारांनी अत्यंत कठीण काळात माझी साथ सोडली नाही. आता प्रकृतीमुळे मी निवडणूक लढवू शकत नाही. परंतु आगामी काळात माझ्या कुटुंबाला तुम्ही सांभाळा, असे भावनिक आवाहन काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज एका पत्राद्वारे रायबरेलीच्या जनतेला केले आहे.

राजस्थानमधून बुधवारी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आज रायबरेलीच्या जनतेच्या नावाने एक पत्र प्रसिद्धीला दिले. त्यात म्हटले आहे की, माझे कुटुंब तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. तुमचा स्नेह व प्रेम माझ्या या सासुरवाडीतून सातत्याने मिळाले. रायबरेलीसोबत माझ्या कुटुंबाचे जुने ऋणानुबंध राहिले आहे. सासरे फिरोज गांधी व सासू इंदिरा गांधी यांना तुम्ही निवडून दिले.

यानंतर आयुष्यातील अनेक चढउतारांसह तुमच्याशी नाते अधिक वृद्धींगत होत गेले. सासू व माझ्या जीवनसाथीची नेहमीसाठी साथ सुटल्यानंतर तुम्ही मला पदरात घेतले. गेल्या दोन निवडणुकीत अत्यंत विपरीत स्थिती असताना सुद्धा तुम्ही एखाद्या खडकासारखे माझ्या पाठीशी उभे राहिलात. हे प्रेम मी कधीही विसरू शकत नाही.

आता वाढते वय व प्रकृतीच्या कारणामुळे पुढील लोकसभा निवडणूक लढणार नाही. परंतु माझे मन व जीवन तुमच्याजवळ नेहमीच राहील. मला जसे तुम्ही सांभाळले तसेच माझ्या कुटुंबाला भविष्यात तुम्ही सांभाळून घ्याल, असा मला विश्वास असल्याचे सोनिया गांधी यांनी पत्रात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात पुजाऱ्यांचं आंदोलन सुरु; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT