Rafale Deal Pm Narendra Modi Corrupt Says Congress President Rahul Gandhi
Rafale Deal Pm Narendra Modi Corrupt Says Congress President Rahul Gandhi 
देश

Rafale Deal: मोदी तर अंबानींचे पंतप्रधान आणि त्यांचेच चौकीदार: राहुल गांधी

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली : राफेल करारात फ्रान्सच्या माजी अध्यक्षांनंतर आता दसॉल्ट कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही अनिल अंबानी यांना भागीदारी दिल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंबानींचे चौकीदार असून, त्यांचेच पंतप्रधान आहेत, अशी जोरदार टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्यावर आज पुन्हा राफेल करारावरून गंभीर आरोप केले आहेत.

नरेंद्र मोदी हे देशाचे नाहीतर अनिल अंबानींचे पंतप्रधान असल्याचा आरोप राहुल गांधीनी आज पत्रकार परिषदेदरम्यान केला. ते देशाची नाहीतर अंबानींची चौकीदारी करण्यात व्यस्त आहेत. रिलायन्स कंपनीला 30 हजार कोटी रुपयांची भागीदारी पंतप्रधान मोदी यांनी देत ते 30 हजार कोटी रुपये अंबानींच्या खिशात घातले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच, मोदींनी लोकांचे पैसेच थेट अंबानींना दिला असल्याचा आरोप राहुलनी मोदी यांच्यावर केला.

देशाचे पंतप्रधान हे भ्रष्टाचारी आहेत. त्यांनी राफेल करारात मोठा भ्रष्टाचार केला असल्याचेही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. राफेल करारासंदर्भात नरेंद्र मोदी एक शब्दही बोलत नाहीत. त्यांनी या प्रकरणावर एवढे आरोप झाल्यावर उघडपणे बोलायला हवे आणि ते या मुद्यावर बोलत नसतील तर, त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यायला हवा. पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यायला हवे, पंतप्रधानांनी दूध का दूध आणि पाणी का पाणी हे सिद्ध करायला हवे. 

तसेच, संरक्षणमंत्री फ्रान्सला जाण्याचे कारणही स्पष्ट करायला हवे. देशाच्या संरक्षणमंत्री फ्रान्सला जातात आणि कोणाला काहीच माहित नसते. हे सर्वांना कळायला हवे हा मुद्दाही राहुल यांनी यावेळी उपस्थित केला.

राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील काही महत्वाचे मुद्दे
-भारताचे पंतप्रधान भ्रष्टाचारी आहेत, सामान्य नागरिकांचे पैसे अंबानींना दिले
-मोदी हे अंबानींचे पंतप्रधान, मोदी त्यांचे चौकीदार आहेत
-पंतप्रधान मोदींनी अनिल अंबानींना 30 हजार कोटींचा मोबदला दिला आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT