Sambit Patra Gandhi
Sambit Patra Gandhi Team eSakal
देश

Rafale Deal : "सन २००७-१२ दरम्यान लाच दिली, तेव्हा कोणाचं सरकार होतं?"

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : राफेलप्रकरणी फ्रान्समधील मासिक मीडियापार्टमधील एका लेखामध्ये खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. यावरुन काँग्रेसने भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधला. याला आता भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच मीडियापार्टचाच उल्लेख करताना काँग्रेसवरच राफेल डीलमध्ये कमिशन घेतल्याचा आरोप केला. भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी या रिपोर्टमधील एका मध्यस्थ्याच्या नावाचा उल्लेख करताना म्हटलं की, आश्चर्याची बाब ही आहे की ज्या मध्यस्थ्याचं नाव ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात समोर आलं होतं, त्याचंच नाव राफेल डीलमध्येही आलं आहे.

पात्रा म्हणाले, "राफेलचा विषयही मोठ्या घोट्याळ्याचा विषय असून हे संपूर्ण प्रकरण सन २००७ ते २०१२ दरम्यान घडलं आहे. या काळात लाचखोरीचा प्रयत्न झाला आहे. यामध्ये मध्यस्थाचं नावही समोर आलं आहे. सुषेण गुप्ता असं याचं नाव आहे. हा कोणी नवा खेळाडू नसून जुनाच खेळाडू आहे. याला ऑगस्टा वेस्टलँड केसमधील किंगपिन मानलं जात आहे. या प्रकरणात मध्यस्थ असलेली व्यक्ती सन २००७ ते २०१२ मध्ये राफेल डीलमधील लाचप्रकरणातील मध्यस्थ होता. जास्त योगायोग व्हायला लागले की ते सत्यही असू शकतं."

राहुल गांधींनी द्यावं उत्तर

पात्रा पुढे म्हणाले, राहुल गांधी कदाचित भारतात नाहीत तर इटलीमध्ये आहेत. इटलीतून त्यांनी उत्तर द्यावं की त्यांच्या पक्षानं जो भ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला आहे, तो त्यांच्यावर उलटला आहे. कारण त्यांच्याच पक्षाबाबत खुलासा झालाय की, लाचखोरी सन २००७ पासून सन २०१२ या काळात झाली आहे. दहा वर्षांपर्यंत भारतीय हवाई दलाकडे फायटर विमानं नव्हती. दहा वर्षांपर्यंत केवळ सामंजस्य करार करण्यात आला तर प्रत्यक्ष व्यवहार अडकवून ठेवण्यात आला. हा करार केवळ कमिशनसाठी अडकवून ठेवण्यात आला होता, असा गंभीर आरोपही पात्रा यांनी पत्रकार परिषदेत केला.

काँग्रेसच्या काळात झालेला हा व्यवहार समोर आला आहे. यातील मजकूल पाहिल्यास आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसेल. हे कमिशन काही २ किंवा ४ टक्क्यांचं नव्हतं. राहुल गांधी, सोनिया गांधी तुमचं अभिनंदन, कारण ४० टक्क्यांच्या दरानं आपण कमिशन घेऊन जगातील कमिशनचं रेकॉर्ड तोडलंय. इथं उलट चोरचं चौकीदाराला जाब विचारत आहे, असंही पात्रा म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

SCROLL FOR NEXT