देश

'पर्रीकरांच्या बेडरूममध्ये राफेलची रहस्ये'

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली : राफेल विमानांच्या व्यवहारातील कथित गैरव्यवहारावरून कॉंग्रेसने आता पंतप्रधान नरेंद्र मोदींसह तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर निशाणा साधला आहे. राफेल गैरव्यवहारातील रहस्ये पर्रीकर यांच्या बेडरूममध्ये असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. राफेलबाबत पर्रीकरांकडे मोठी माहिती असून ती बाहेर यायला हवी, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे. 

सुरजेवाला यांनी या वेळी गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित प्रतापसिंह राणे यांची ऑडिओ क्‍लिप सादर केली, यात राणे हे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या बेडरूममध्ये राफेल गैरव्यवहाराशी संबंधित माहिती असल्याचे म्हणत आहेत. ही ऑडिओ क्‍लिप कधीची आहे, हे मात्र सुरजेवाला यांनी सांगितले नाही. 

मला कोणीही काही करू शकत नाही.. माझ्याकडे राफेल गैरव्यवहाराची माहिती आहे. माझ्या घरातील बेडरूमध्ये यासंबंधित कागदपत्रे आहेत, असे पर्रीकर म्हणाल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले. पर्रीकरांकडील माहिती समोर आलीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. 

पंतप्रधान मोदी एकटे पॅरिसमध्ये गेले होते, त्यांच्या शिष्टमंडळात अंबानी होते; पण आपले संरक्षणमंत्री त्या वेळी गोव्यात मासे खरेदी करत होते. याची चौकशी व्हायलाच हवी. संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीपासून वाचण्याचा प्रयत्न मोदी करत आहेत, ते समितीलाही कागदपत्रे दाखवायला तयार नाहीत, असा आरोप सुरजेवाला यांनी केला. 

ती टेप बनावट : विश्वजित राणे 

पणजी : कॉंग्रेसच्या "ऑडिओ बॉम्ब'नंतर काही वेळातच विश्वजित राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेसचे सर्व आरोप फेटाळले. 

कॉंग्रेसने सादर केलेल्या ऑडिओ टेपमध्येच गैरव्यवहार झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री पर्रीकर आणि त्यांच्या मंत्र्यांमधील संभाषणाची चुकीची माहिती पसरविण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने केला आहे. पर्रीकर यांनी कधीच राफेलशी संबंधित दस्तऐवजांचा उल्लेख केलेला नाही. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राणे यांनी पत्रकार परिषदेत केली. 

पर्रीकर यांनी कधीच राफेलचा उल्लेख केलेला नाही. कॉंग्रेसने बनावट ऑडिओ क्‍लिप सादर केली आहे. याची पोलिसांकडून चौकशी व्हायला हवी, असे राणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT