देश

राघव चढ्ढा बनणार राज्यसभेचे सर्वांत तरुण खासदार; ‘आप’चे ५ उमेदवार जाहीर

सूरज यादव

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाने पंजाबमधून राज्यसभेवर निवडून द्यायच्या ५ उमेदवारांची यादी आज जाहीर केली. माजी क्रिकेटपटू हरभजनसिंग, पंजाबमधील ‘आप’च्या विजयाचे प्रमुख शिल्पकार राघव चढ्ढा, आयआयटीचे प्रा. डॉ. संदीप पाठक, संजीव अरोरा व अशोक मित्तल यांना आप राज्यसभेत पाठविणार आहे. ३३ वर्षीय चढ्ढा यांना या वरिष्ठांच्या सभागृहाच्या इतिहासातील सर्वांत तरुण खासदार बनण्याचा मान मिळणार आहे.

११७ सदस्यांच्या पंजाब विधानसभेत ‘आप’ने ९२ जागा जिंकून छप्परफाड विजय मिळविला आहे. या राज्यातील ७ खासदारांचा कार्यकाळ येत्या ४ महिन्यांत संपणार आहे. ९ एप्रिलला पहिल्या टप्प्यात प्रतापसिंग बाजवा, एस.एस डुल्लो, श्वेत मलिक व शिरोमणी अकाली दलाचे नरेश गुजराल व एस एस ढींढसा तर ४ जुलै रोजी निवृत्त होणाऱ्यांत वरिष्ठ कॉंग्रेस नेत्या अंबिका सोनी व अकाली दलाचे बलविंदरसिंग भुंदर यांचा समावेश आहे. या ७ पैकी एकही सदस्य पुन्हा निवडून येण्याची शक्यता नाही. ढिंढसा यांनी अकाली दल सोडून भाजपशी आघाडी केल्याने भाजपला त्यांना बक्षीस द्यायचेच असेल तर दुसऱया राज्यातून राज्यसभेवर आणावे लागेल. चढ्ढा व पाठक हे आपच्या ‘रणनीतीकार' टीमचे महत्वाचे आधारस्तंभ मानले जातात. पेशाने चार्टर्ड अकौटंट असलेले चढ्ढा यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे पदवीधर आहेत.

चढ्ढा यांनी अगदी तरुणवयात दिल्लीतील राजेंद्रनगर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर ते ‘आप’चे राष्ट्रीय प्रवक्ते बनले. केजरीवाल यांनी त्यांच्यावर पंजाबची जबाबदारी सोपविल्यावर चढ्ढा यांनी गेली ३ वर्षे पंजाबात तळ ठोकला व बूथ पातळीपासून आपच्या संघटनात्मक बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावली. डॉ. पाठक यांच्यावरही केजरीवाल यांनी चढ्डा यांच्या बरोबरीने पंजाबची जबाबदारी दिली होती. गेली ३ वर्षे तेही पंजाबमध्येच होते. मूळचे छत्तीसगडचे असलेले डॉ. पाठक मूळचे छत्तीसगडच्या मुंगेर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी केंब्रीजमधून उच्चशिक्षण घेतले आहे. २००६ पासून ते दिल्ली आयआयटीमध्ये प्राध्यापक आहेत. माजी क्रिकेटपटू हरभजनसिंग यांनी २०१६ मध्ये आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. २०२१ मध्ये त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पंजाब निवडणुकीच्या काळात त्यांनी ‘आप’मध्ये प्रवेश केला. आपच्या क्रीडा प्रोत्साहन योजनेत त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी आहे. याव्यतिरिक्त अशोक मित्तल लवली व्यावसायिक विद्यापीठाचे कुलपती असून संजीव अरोरा हे कृष्णा प्राण ब्रेस्ट कर्करोग धर्मादाय विश्वस्त संस्थेचे संस्थापक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT