मायावती Sakal
देश

'ज्यांना स्वत:चं घर संभाळता येत नाही त्यांनी...' मायावतीचं गांधीना प्रत्युत्तर

राहुल गांधी यांच्या युतीच्या वक्तव्यावर मायावती यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

दत्ता लवांडे

नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या युतीच्या वक्तव्यावर मायावती यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. युतीबद्दल बोलताना मायावती या निवडणूक लढल्या नाहीत असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं, त्यानंतर मायावती यांनी काँग्रेसवर टीका करत त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान काल राहुल गांधी यांनी एका सभेत बोलताना "मायावती निवडणुक लढल्याच नाहीत, त्यांना आम्ही युतीसाठी संपर्क केला पण त्यांनी साधं उत्तर देखील दिलं नाही. कांशीराम जी यांनी उत्तरप्रदेशमध्ये दलितांसाठी आवाज उठवला, काम केलं. त्यांचा मी प्रचंड आदर करतो पण त्याचा काँग्रेसवर परिणाम झाला होता. या वेळेला त्या मायावती दलितांसाठी लढल्या नाहीत कारण तेथे ED, CBI यासारख्या संस्था आहेत." असं ते सभेत म्हणाले.

दरम्यान याला उत्तर देताना मायावती म्हणाल्या की, "बसपा भाजपाला घाबरत असल्याचा आरोप त्यांनी केला आणि काँग्रेससोबत युती करण्याची ऑफर दिली, याबरोबरच त्यांनी मला मुख्यमंत्रीपदाचीसुद्धा ऑफर दिली. त्यानंतर मी त्यांना प्रतिसाद दिला नाही हे पूर्णपणे खोटं आहे." असं त्या गांधींना प्रत्युत्तर देताना म्हणाल्या. पुढं त्या म्हणाल्या की, "त्यांच्या बोलण्यावरुन त्यांच्या मनात असलेला दलित आणि बसपा बद्दल द्वेष दिसून येतो."

तसंच पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, काँग्रेस पक्ष हा त्यांचा मार्ग ठरवू शकत नाही, ते त्यांचं स्व:ताचं घर व्यवस्थित करु शकत नाही, सांभाळू शकत नाहीत आणि ते आमच्या पक्षाबद्दल बोलतात. तसंच काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी बसपा बद्दल बोलताना १०० वेळा विचार करावा." असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT