Rahul Gandhi accuses BJP of dynasty politics calls Union Cabinet parivar mandal marathi news  
देश

Rahul Gandhi On Union Cabinet : हे एनडीएचे ‘परिवार मंडळ’; घराणेशाहीवरून राहुल यांची मंत्रिमंडळावर टीका

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळावर टीका केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली, ता. ११ (पीटीआय) ः काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात ‘एनडीए’मधील नेत्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना स्थान दिल्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळावर टीका केली आहे.

‘‘हे मंत्रिमंडळ नसून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे ‘परिवारमंडळ’ आहे,’’ अशी टीका राहुल यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये केली आहे.त्यांनी नव्या मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या मंत्र्यांपैकी सुमारे २० मंत्र्यांची यादी जाहीर करून, हे सर्व मंत्री हे राजकीय पार्श्‍वभूमी असलेल्या घराण्यातील आहेत असे सांगितले आहे. ‘‘भाजपच्या बोलण्यात आणि प्रत्यक्ष वागण्यात किती फरक आहे, आहे हे यावरून दिसून येते,’’ असे राहुल म्हणाले.

या मंत्र्यांवरून सरकारवर टीका

राहुल गांधी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये राजकीय पार्श्‍वभूमी असलेल्या घराण्यातील मंत्र्यांची नावे दिली आहे. यात माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे पुत्र केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी, माजी केंद्रीय मंत्री माधवराव शिंदे यांचे पुत्र आणि दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, अरुणाचलच्या माजी विधानसभा अध्यक्षांचे पुत्र केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू, माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचे नातू कौशल्य विकास राज्यमंत्री जयंत चौधरी, माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री चिराग पासवान, मध्य प्रदेशच्या माजी मंत्री जयश्री बॅनर्जी यांचे जावई केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांचे पुत्र केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर अशा २० मंत्र्यांची यादीच राहुल गांधी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये दिली आहे.

गेल्या अनेक पिढ्यांपासून संघर्ष, सेवा आणि बलिदानाची परंपरा असलेल्या घराण्याला घराणेशाहीवरून बोलणारे आता त्यांच्याच सरकारी कुटुंबातील व्यक्तींना सत्तेचे खैरात वाटत आहेत.

राहुल गांधी, काँग्रेसचे नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार नाही, जय पवार यांची माहिती

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

11th Admission : अकरावी प्रवेशासाठी १२.४९ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; पहिल्या फेरीची निवड यादी शुक्रवारी जाहीर

SCROLL FOR NEXT