Rahul Gandhi  
देश

Rahul Gandhi : कोणी काहीही म्हणो, राहुल गांधी अदानींचा मुद्दा सोडत नाहीत अन् पक्ष सोडणाऱ्यांनाही..

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - मोदी आडनाव प्रकरणात सदस्यत्व गमावलेले राहुल गांधी सातत्याने अदानी प्रकरणावर प्रश्न उपस्थित करत आहेत, पण शनिवारी त्यांनी आपल्या ट्विटमध्ये आता भाजपवासी झालेल्या माजी काँग्रेसजनांवर निशाणा साधला.

राहुल गांधींच्या ट्विटमध्ये एका वर्ड प्ले पझलचा फोटो दाखवण्यात आला, ज्यात केंद्रस्थानी अदानी लिहिले आहे. पण त्याच फोटोवर त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांची नावेही लिहिली आहे. ज्यांनी आता काँग्रेस आणि राहुल गांधी यांची साथ सोडली आहे.

राहुल गांधींनी ट्विटमध्ये लिहिले की, 'सत्य लपवण्यासाठी, ते दररोज भटकवतात. प्रश्न एकच आहे - अदानींच्या कंपन्यांमधील २०,००० कोटींचा बेनामी पैसा कोणाचा आहे? यामध्ये गुलाम नबी आझाद, सिंधिया, किरण कुमार रेड्डी, हिमंत बिस्वा सरमा आणि अनिल अँटनी यांचा समावेश आहे.

गुलाम नबी आझाद

अनेक दशकांपासून काँग्रेसशी संबंधित असलेले गुलाम नबी आझाद गेल्या वर्षी ऑगस्ट 2022 मध्ये माजी काँग्रेसी झाले. अनेक दिवसांच्या नाराजीनंतर त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि देशातील या सर्वात जुन्या पक्षाच्या सध्याच्या नेतृत्वावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. नुकतेच त्यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले असून, कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी राहुल गांधीच त्यांच्या काँग्रेस सोडण्याचे कारण सांगितले. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदीचं कौतुकही केलं.

ज्योतिरादित्य सिंधिया

अदानींच्या 'डी'मधून राहुल गांधी यांनी आपले जवळचे मित्र ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. गांधी कुटुंबाची दोन पिढ्यांपासून केंद्रीय मंत्री सिंधिया यांच्या कुटुंबाशी मैत्री आहे, परंतु मार्च 2020 मध्ये सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मैत्रीची मुळं कमकुवत झाली असतील, पण सिंधिया यांनी कधीच थेट राहुल गांधींवर निशाणा साधला नाही. राहुल गांधी यांची वक्तव्येही काँग्रेसची अंतर्गत बाब म्हणून फेटाळून लावण्यात आली. काँग्रेसजनांनी त्यांना अनेकदा स्वार्थी आणि देशद्रोही म्हटले असले तरी सिंधिया या वक्तव्यांना कधीही महत्त्व देताना दिसले नाहीत. पण शुक्रवारी ग्वाल्हेरमधील एका व्यासपीठावरून त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसकडे आता एकच विचारधारा शिल्लक राहिली आहे, ती म्हणजे देशद्रोही, देशविरोधी काम करणारी विचारधारा. या वक्तव्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

किरणकुमार रेड्डी

रेड्डी यांच्यावर राहुल गांधींनी टीका केली आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. रेड्डी यांना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी भाजपमध्ये प्रवेश दिला. किरण रेड्डी यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. 'मला कधी काँग्रेस सोडावी लागेल, असे वाटले नव्हते. माझे काँग्रेसशी खूप जुने संबंध आहेत. कार्यकर्त्यांचे ऐकले जात नाही आणि ही केवळ एका राज्याची गोष्ट नाही, तर संपूर्ण देशातील पक्षाची कहाणी असल्याचं ते म्हणाले होते.

हिमंत बिस्वा सरमा

ईशान्य भारतात काँग्रेसचा झेंडा उंच ठेवण्यात हिमंत बिस्वा सरमा हे नेहमीच महत्त्वाचे नाव राहिले आहे. २०११ मध्ये आसाममध्ये काँग्रेसने स्वबळावर सरकार स्थापन केले, पण हिमंता यांच्या मते त्यांना खऱ्या अर्थाने हवा तसा दर्जा कधीच मिळाला नाही. राहुल गांधी यांनी अनेकदा भेटायला वेळ दिला नाही, असा आरोपही त्यांनी केला. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता ते आसामचे मुख्यमंत्री आहेत. राहुल गांधींवर निशाणा साधण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. त्यामुळे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये त्यांचं नाव घेतलं आहे.

अनिल अँटनी

राहुल गांधींनी 'अदानी' नावातून 'अनिल' लिहिलं आहे. या माध्यमातून त्यांनी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अनिल अँटनी यांच्याकडे लक्ष वेधले आहे. माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांचे चिरंजीव अनिल अँटनी यांनी गुरुवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसीच्या वादग्रस्त डॉक्युमेंट्रीवर टीका करणाऱ्या ट्विटनंतर त्यांनी जानेवारीमध्ये काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शिवाय काँग्रेसवर टीकाही केली. त्यामुळे ते राहुल गांधीयांच्या निशाण्यावर आले.

राहुल गांधी यांच्या ट्विटला भाजपमध्ये प्रवेश केलेले अनिल अँटनी यांनी प्रत्युत्तर दिले. अनिल अँटनी यांनी राहुल गांधींवर टीका करताना लिहिले की, "वरिष्ठ नेत्यांसोबत माझे नाव लिहिल्याबद्दल मला आनंद होत आहे. तुम्ही लिहिलेली नावे देशद्रोह्यांची नाहीत. ही नावे कुटुंबासाठी नव्हे तर देशासाठी काम करणाऱ्यांची आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT