Rahul Gandhi Sakal
देश

Rahul Gandhi: जागतिक वृत्तपत्रांनी आज अदानींच्या बातम्या छापल्या, हा पैसा कुणाचा?; राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल

Adani group News: इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले.

Manoj Bhalerao

Rahul Gandhi Marathi News: इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी तीन जातगिक वृत्तपत्राचा दाखला देत गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संबंधावर प्रश्न उपस्थित केले.

अदानी कुटुंबाने आपल्या शेअरमध्ये स्वत:चे पैसे गुंतवून गैरव्यवहार केल्याचा आरोप यावेळी त्यांनी लावला. गार्डीयन, फायनान्शियल एक्स्प्रेच्या बातम्यांचा दाखला दिला. या वृत्तपत्रांकडे अंतर्गत कागदपत्रे आण मेल्समधील संभाषणांचा पुरावा आहे.

या कंपनीच्या गुंतवणूकदारांमध्ये दोन परदेशी नागरिकांचा समावेश असल्याचा आरोप त्यांनी लावला. या दोन व्यक्तींची नावे देखील त्यांनी सांगितली.

यावेळी त्यांनी ईडी आणि सीबीआयच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले. यावेळी त्यांनी अदानींविरोधात केल्या गेलेल्या चौकशीबाबतही शंका व्यक्त केली.

गौतम अदानी यांच्या विरोधात सेबीद्वारे एक चौकशी करण्यात आली होती. त्या प्रकरणात त्यांना क्लिनचीट देण्यात आली. काही काळानंतर चौकशी करणाऱ्या सेबीच्या अधिराऱ्याला अदानींच्या कंपनीत नोकरी मिळाली. त्यामुळे या अधिकाऱ्याने अदानीविरुद्ध जी चौकशी केली, ती संशयास्पद असल्याचे राहुल गांधी म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये पुन्हा हाहाकार! गंडकी नदीला अचानक पूर, घरं-पूल गेले वाहून; पहाटे नागरिकांचे स्थलांतर, बचावकार्य सुरू

IND vs NZ ODI Series: भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंचं पुनरागमन, पाहा संपूर्ण स्क्वॉड

IND W vs ZIM W: भारत-झिम्बाब्वे महिला क्रिकेट मालिकेचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठे रंगणार टी-२० आणि वनडे सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक

BEST Bus Stop: प्रवाशी वाऱ्यावर, बेस्टच्या बस थांब्यात फ्लिपकार्टचं दुकान;वांद्र्यातला धक्कादायक प्रकार

VIRAL VIDEO: ‘रीटेक्सपासून रासपर्यंत’; ऐश्वर्या नारकर यांचा गरबा पाहिलात का? नेटकरी म्हणाले…

SCROLL FOR NEXT