Prashant Kishor on congress leadership  esakal
देश

काँग्रेस नेतृत्वाच्या फॉर्म्युल्यात राहुल-प्रियांका नाहीत : प्रशांत किशोर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : काँग्रेस येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांना पक्षात घेणार होते. पण, त्यांच्या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. प्रशांत किशोर काँग्रेससोबत पुढे का गेले नाहीत? तसेच काँग्रेसच्या नेतृत्वाच्या (Congress Leadership) फॉर्म्युल्यात कोणाचं नाव होतं? याबाबत त्यांनी स्वतःच माहिती दिली आहे.

प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला काही सूचना दिल्या होत्या. त्यानुसार १० दिवसांत काम सुरू व्हावे, अशी किशोर यांची इच्छा होती. पण, या अटी काँग्रेस कमिटीला मान्य नव्हत्या, अशी माहिती मिळतेय. प्रशांत किशोर यांच्या काँग्रेससोबत तीन बैठका झाल्या. यावेळी राहुल गांधीही उपस्थित होते. त्यांनी आणि पक्षातील इतर नेत्यांनी किशोर यांच्या सूचनांचे पालन केले. किशोर यांनी ९ तासांचे सादरीकरण केले. पण, सोनिय गांधी वगळता कोणीही ते पूर्ण पाहिले नाही, असं प्रशांत किशोर यांनी ''आज-तक'' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं.

काँग्रेसला कोणाचीही गरज नाही. मीडिया मला गरजेपेक्षा मोठा करून दाखवत आहे. माझी उंची, चारित्र्य इतके मोठे नाही की राहुल गांधी मला इतका वेळ देतील, असे प्रशांत किशोर म्हणाले. प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला नेतृत्वाचा फॉर्म्युला देखील दिल्याची माहिती आहे. पण, यामध्ये कुठेही राहुल गांधी किंवा प्रियांका गांधींचं नाव नव्हतं, असं प्रशांत किशोर यांनी सांगितलं. तसेच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांबाबत देखील त्यांनी वक्तव्य केलं. या निवडणुकांमध्ये काँग्रेस नसेल हे मी आधीच सांगितलं होतं, असं प्रशांत किशोर म्हणाले.

आगामी निवडणुकांमध्ये भाजपला आव्हान देण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. त्यासाठी बैठका देखील सुरू आहे. त्यामुळे येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना कोण आव्हान देणार? असा प्रश्न प्रशांत किशोर यांना विचारला असता त्यांनी उत्तर देण्याचं टाळलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NED, T20 WC: टीम इंडियाचा विजयी चौकार! नेदरलँड्सने दिली कडवी झुंज; आता Super 8s मध्ये भारतासमोर ३ तगडे संघ

मोठी बातमी! उजनीतून सोडलेले पाणी कर्नाटकने आडविले, दक्षिण सोलापूरमधील शेती, गावे तहानली; तरीपण जलसंपदामंत्री विखे पाटील कॉल उचलेनात, वाचा...

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपींनी दिला कबुलीजबाब!

Dumper Accident : भरधाव डंपरची आठ वाहनांना धडक; कात्रज ते वडगावदरम्यान महामार्गावर थरार

Mangalwedha News : 1650 अल्पभूधारक शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा लाभ देण्याची सुनंदा आवताडे यांची भरत गोगावले यांच्याकडे मागणी

SCROLL FOR NEXT