Rajasthan Assembly Election 
देश

Rajasthan Assembly Election: "शाहरुख खान, ऐश्वर्या राय दिसेल पण..."; PM मोदींवर हल्ला करताना राहुल गांधींंनी दिले उदाहरण

Sandip Kapde

राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचे दिवस जवळ येत आहेत. तसेच राजकीय पक्षांचा प्रचार देखील आक्रमक होत आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये लढाई सुरु आहे. दोन्हींही पक्ष एकमेकांवर टिका करण्याची एकही संधी सोडत नाही आहेत.

राहुल गांधींनी उदयपूरच्या वल्लभनगरमध्ये एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा उपस्थित करत भाजपवर टीका केली. जातनिहाय जनगणना देशाचा एक्सरे आहे. कोणाची लोकसंख्या किती आहे, हेच माहीत नसेल, तर भागिदारीबाबत कसे बोलणार, असा सवार राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी यांचा चेहरा दिवसभर टीव्हीवर दिसतो कारण ते जनतेचा पैसा अदानी आणि अंबानींना देतात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जनतेचे लक्ष वळवल्याचा आरोप करत राहुल गांधींनी ऐश्वर्या राय आणि शाहरुखचे उदाहरण दिले. "तुम्ही कधी टीव्हीवर शेतकरी किंवा मजूर पाहिला आहे का, तर नाही. तुम्हाला शाहरुख खान, ऐश्वर्या राय दिसेल, तुम्हाला क्रिकेटचा सामना दिसेल. मात्र शेतकरी दिसत नाहीत.  दुसरीकडे जनतेचा खिसा रिकामा होतो. नरेंद्र मोदी यांचे लक्ष लोकांचे लक्ष विचलित करणे आहे. नंतर अदानी येतात आणि तुमचा खिसा रिकामा करतात,"  असे देखील राहुल गांधी म्हणाले.

दुसरीकडे, उत्तराखंडमध्ये कामगार बोगद्यात अडकले आहेत. आम्हाला धक्का बसला आहे. मात्र मीडिया 24 तास क्रिकेटवर बोलत असतो. ही चांगली गोष्ट आहे. मात्र कामगारांना देखील दोन मिनिटे द्या. आमच्या कार्यकर्त्यांनाही दोन मिनिटे द्या. (Latest Marathi News)

नरेंद्र मोदींचा चेहरा 24 तास प्रसारमाध्यमांमध्ये दिसून येतो. TRP वाढतो कारण नरेंद्र मोदी त्यांच्यासाठी काम करतात. अदानी-अंबानी आणि नरेंद्र मोदी खूप चांगली डील आहे. नरेंद्र मोदी त्यांना जीएसटीचे पैसे पाठवतात, असे राहुल गांधी म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT