Rahul Gandhi attacks modi govt says received alert from Apple about state-sponsored hacking and Narendra Modi's soul is with Adani  Sakal
देश

Rahul Gandhi: 'मोदींचा आत्मा अदानींच्या हातात' अ‍ॅपल अलर्टचे थेट कनेक्शन...; राहुल गांधींचा मोठा आरोप

Rahul Gandhi: काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर हेरगिरीचा आरोप केला.

राहुल शेळके

Rahul Gandhi: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज (मंगळवारी) पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर हेरगिरीचा आरोप केला. पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर सडकून टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्मा अदानीमध्ये आहे.

राहुल गांधी म्हणाले की, त्यांचा फोन टॅप होत आहे याची त्यांना अजिबात पर्वा नाही. केंद्र सरकारवर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले, 'राजा हा राजा नाही, सत्ता दुसऱ्याच्या हातात आहे. अदानीवर टिका करताच गुप्तचर संस्था, सीबीआय तपास चालू करतात. सध्या देशात नंबर 1 वर अदानी, नंबर 2 वर पंतप्रधान आणि नंबर 3 वर अमित शहा आहेत.

पत्रकार परिषदे दरम्यान राहुल गांधी यांनी एका राजाची गोष्ट सांगितली. यावेळी ते म्हणाले की , "भारतात एक राजा असायचा. सर्वजण त्याच्या विरोधात उभे राहिले. जनता त्याच्यावर टीका करत होती. त्याच्यावर कितीही हल्ले झाले/ टीका झाली तरी त्या राजाला काहीही होत नव्हते.

मग अनेक वर्षांनी विरोधी पक्षाचे लोक एका ऋषीकडे गेले आणि म्हणाले, मला सांगा, आम्ही काय करु. आम्ही या राजावर टीका करतो, जनता याच्या विरोधात आहे. तरी काहीही होत नाही, आम्ही बाण चुकीच्या ठिकाणी मारत आहेत असे दिसते.

ऋषी शहाणे होते. ते म्हणाले की, या राजाचा आत्मा त्याच्यामध्ये नाही. राजाचा आत्मा एका पोपटात आहे. त्या पोपटाकडे जाऊन तुम्ही राजाला पकडू शकता"

''नरेंद्र मोदींचा आत्मा अदानीमध्ये आहे"

राहुल गांधी म्हणाले की, नरेंद्र मोदींचा आत्मा अदानीमध्ये आहे. पोपट कुठेतरी बसला आहे आणि राजा दुसरीकडे बसला आहे. संपूर्ण विरोधक बराच काळ राजावर हल्ला करत होते, पण वास्तव हे आहे की राजा हा राजा नाही. सत्ता दुसऱ्याच्या हातात आहे. सत्ता ही अदानींच्या हातात आहे.

राहुल गांधी म्हणाले, माझ्या कार्यालयातील प्रत्येकाला अॅपलकडून अलर्ट मिळाला आहे. केसी वेणुगोपाल, पवन खेडा, प्रियांका चतुर्वेदी, राघव चड्ढा, टीएस सिंहदेव, महुआ मोईत्रा, हे सर्वजण कोणत्या ना कोणत्या प्रकारे या प्रकरणांमध्ये सामील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT