देश

राहुल गांधींना ज्योतिरादित्य शिंदेंचं प्रत्त्युत्तर; म्हणाले... 

सकाळवृत्तसेवा

राहुल गांधी यांनी स्वत:ची चिंता करावी, माझी चिंता करु नये. असे प्रत्त्युत्तर भाजपा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलं आहे. ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसमध्ये असते तर मुख्यमंत्री झाले असते. आता भाजपमध्ये जाऊन बॅकबेंचर बनल्याची टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी केली होती. शिंदे यांनी राहुल गांधी यांना आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे.  ज्योतिरादित्य शिंदे यांनी गेल्या वर्षी मार्च महिन्यात काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. 

शिंदे काय म्हणाले?
राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत बोलणे योग्य समजत नाही. जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीचा एक स्तर असतो. गेल्या एक वर्षात मी खूप वर आलो आहे. राहुल गांधी आता माझी जेवढी चिंता करत आहेत. तेवढी चिंता मी काँग्रेसमध्ये असताना केली असती तर ते अधिक उचित ठरले असते.

राहुल गांधी काय म्हणाले होते?

सोमवारी युथ काँग्रेसच्या एका बैठकीत बोलताना राहुल गांधी म्हणाले, "ते (शिंदे) जर काँग्रेससोबत राहिले असते तर मुख्यमंत्री होऊ शकले असते, मात्र भाजपात ते बॅकबेंचर बनून राहिले आहेत. शिंदे यांच्याकडे काँग्रेससोबत काम करताना पक्षाला मजबूत करण्याचा पर्याय होता. मी त्यांना म्हटलं होतं की एक दिवस तुम्ही मुख्यमंत्री बनाल मात्र त्यांनी दुसरा मार्ग निवडला. मी तुम्हाला लिहून देतो की भाजपामध्ये ज्योतिरादित्य शिंदे कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत. त्यासाठी त्यांना पुन्हा इकडेच यावं लागेल.

ज्योतिरादित्यांची बाजू घेत मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. जे लोक दोन वर्षात काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडू शकले नाहीत ते कोणाला मुख्यमंत्री काय बनवणार? असं असेल तर काँग्रेसनं राजस्थानात सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करावं.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

SCROLL FOR NEXT