narendra modi and rahul gandhi 
देश

Rahul Gandhi : माझ्या बदनामीसाठी भाजपने ५ हजार कोटी खर्च केले, पण...; राहुल यांचा सनसनाटी आरोप

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - काँग्रेसनेते राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. त्यांची भारत जोडो यात्रा लवकरच उत्तर प्रदेशात दाखल होणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी सातत्याने भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करत आहे. त्यातच आज राहुल गांधी यांनी भाजपवर सनसनाटी आरोप केला आहे. (Rahul Gandhi News in Marathi)

राहुल गांधी म्हणाले की, माझी बदनामी करण्यासाठी भाजपने ५ हजार कोटी रुपये खर्च केले. याआधी मी यावर ९९ टक्के विश्वास ठेवत होतो. मात्र आता मला १०० टक्के खात्री आहे की, भाजपने बदनामीसाठी ५ हजार कोटी खर्च केले. मात्र सत्य लपविण्यासाठी कितीही खर्च करा किंवा कितीही कँपियन चालवा, काहीही होणार नाही, असंही राहुल यांनी म्हटलं.

राहुल पुढं म्हणाले की, मी बारकाईने निरक्षण केलं आहे. आता बदनामीसाठीचा खर्च ६ हजार कोटींवर पोहोचला आहे. आता आणखी थोडे खर्च करा. तुमच्याकडे पैशांची कमतरता नाही. मात्र त्याने आपल्याला काहीही फरक पडणार नाही, असंही राहुल यांनी ठणकावून सांगितलं.

राहुल गांधी यांची प्रतिमा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मलिन झाली आहे. राहुल यांना सातत्याने पप्पू म्हणून हिनवलं जातं. मात्र आज पहिल्यांदाच राहुल यांनी त्यांच्या बदनामीवरून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

Teachers Agitation : सामूहिक रजा घेत शिक्षकांचे आंदोलन; पंचायत समितीवर मोर्चा, पाच तास धरणे आंदोलन, मुख्यालयाची अट शिथिल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT