Rahul Gandhi  file Photo
देश

किती कुटुंबांच्या नशिबी ‘सुखी रोटी’? राहुल यांचा केंद्राला सवाल

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला महागाईच्या मुद्द्यावरून पुन्हा लक्ष्य केले.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला महागाईच्या मुद्द्यावरून पुन्हा लक्ष्य केले. किती कुटुंबांना ‘सुखी रोटी’ खावी लागत आहे? किती विद्यार्थ्यांना शाळा सोडावी लागली अशा प्रश्नांच्या फेरी त्यांनी झाडल्या. ‘उत्तर स्पष्ट आहे, की महागाई वाढते आहे आणि आर्थिक उत्पन्न घटते आहे,‘ अशी टीका त्यांनी केली. (Rahul Gandhi On Central Government)

देशातील पाच राज्यांतील निवडणुकांमुळे राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांची धुळवड सुरु आहे. त्यात काँग्रेसही मागे नाही. राहुल यांनी ट्विटरवर एका वर्तमानपत्रातील बातमीचा संदर्भ दिला. जानेवारीत महागाई निर्देशांक ६.०१ टक्क्यांवर पोचल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. ट्विटमध्ये त्यांनी काही प्रश्‍न देखील उपस्थित केले.

केंद्र सरकारवर महागाई वाढल्याचा ठपका ठेवताना लोकांचे आर्थिक उत्पन्न घटल्याचा दावा त्यांनी केला आहे. लोकांच्या वेदना आणि समस्या मोजणार कशा? अनेकांना जेवणाची भ्रांत आहे, मुलांना शाळा सोडावी लागली आहे. अनेक महिलांना महागाईमुळे त्यांचे दागिने गहाण ठेवावे लागले आहेत. अनेकांच्या तोंडावरील हास्य मोदी सरकारने हिरावून घेतले आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दिल्ली सरकारवरही टीका

राहुल यांनी काल दिल्ली सरकारला लक्ष्य केले होते. दिल्लीतील अंगणवाडी सेविकांच्या वेतनाच्या मुद्द्यावर त्यांनी ट्विट केले. अंगणवाडी कार्यकर्त्यांची हक्काची लढाई योग्य आहे. त्यांनी कोविड काळात आपल्या जिवाची पर्वा न करता लोकसेवा केली, परंतु दिल्लीचे मुख्यमंत्री त्यांना योग्य वेतन देत नाही. त्यांना सन्मानाची वागणूकही मिळत नाही. हे केवळ नावाला आम आदमी आहेत, अशी टीका त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Bhayandar Paryushan Controversy : भाजप आमदारांचा अजब फतवा! विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्व काळात पालकांना शाळेचा मेसेज, राजकीय वाद पेटला

Indian Army Success Story: शेतकरी कुटुंबातील हर्षची भरारी! वयाच्या २४व्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंट; आई गृहिणी, वडील शेतकरी, मुलाची प्रेरणादायी काहाणी

Pune MPSC Student Kidnapping : धक्कादायक! पुण्यात मध्यरात्री MPSC च्या विद्यार्थ्याचे अपहरण; आरोपी काळ्या रंगाच्या गाडीत आले अन्...

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Ahilyanagar Crime: अशीही सावकारकी; दोन कोटी कर्जाचे झाले २२ कोटी, दोघांना अटक

SCROLL FOR NEXT