

Ravi Shastri And Sunil Gavaskar on Vaibhav Sooryavanshi
Sakal
India vs England 1st T20I: भारत आणि इंग्लंड संघात पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील चेस्टर-ले-स्ट्रीटला होणारा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. पण सामना रद्द होण्यापूर्वी भारतीय संघाची २० षटकांची फलंदाजी पूर्ण झाली होती.
भारताने २० षटकात ७ बाद १८९ धावा केल्या होत्या. मात्र हा सामन्यातील नाणेफेकीपासूनच एक मुद्दा चर्चेत होता, तो म्हणजे १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला (Vaibhav Sooryavanshi) बेंचवर बसवण्याचा. वैभवला याआधी आयर्लंडविरुद्ध झालेल्या दोन्ही टी२० सामन्यातही खेळवण्यात आले नव्हेत.
पण इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात त्याचे पदार्पण होईल, अशी अनेकांची अपेक्षा होती. पण भारतीय संघ व्यवस्थापन त्याच्याबाबत अद्यापही त्याला खेळण्यासाठी पूर्ण तयार नाहीत. तसेच त्याच्या जागेवर खेळवायचे कोणाला, हा देखील प्रश्न आहे. आता याबाबत भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि सुनील गावसकरांनी (Sunil Gavaskar) मतं मांडली आहेत.