Rahul Gandhi Profile Picture  Sakal
देश

मोदींपाठोपाठ राहुल गांधींनीदेखील बदलला DP; टीकाकारांना दिलं प्रत्युत्तर

सकाळ डिजिटल टीम

.दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमिवर आपल्या ट्वीटर अकाउंटचा प्रोफाईल फोटो बदलला आहे. माजी दिवंगत पंतप्रधान पंडित नेहरू यांचा भारतीय ध्वाजासोबत असलेला फोटो त्यांनी अपडेट केल्यामुळे भाजपकडूनही त्यांच्यावर टीका होत आहे.

(Rahul Gandhi Changes Twitter Profile Picture)

"देश की शान है, हमारा तिरंगा हर हिंदुस्तानी के दिल में है, हमारा तिरंगा" असा आशय लिहित राहुल गांधी यांनी ट्वीटरवर हा फोटो पोस्ट देखील केला आहे. दरम्यान स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहिम काढली असून देशातील प्रत्येक घरावर तिरंगा लागला पाहिजे असं अवाहन केलं आहे.

सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या आरोपाला राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी त्यांच्याच शैलीत उत्तर दिले आहे. त्यांनी ट्विटरवर प्रोफाईल पिक्चर तर बदललेच पण एक मेसेजही लिहिला. राहुल गांधींनी तिरंग्याच्या चित्रासह डीपी बदलला आहे. या छायाचित्रात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) तिरंगा धरलेले दिसत आहे. राहुलने हे छायाचित्र ट्विट करून लिहिले, "देशाची शान आमचा तिरंगा आहे; आपला तिरंगा प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहे."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटचा डीपी बदलून तिरंगा (Indian Flag) ठेवला आहे. यानंतर सोशल मीडियात स्पर्धा लागल्याची पहायला मिळालं असून सर्व केंद्रीय मंत्री, खासदार, भाजप नेते यांच्याशिवाय सर्वसामान्यांनीही आपले डीपी बदलले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus Accident: भीषण बस अपघात! जिवंत जळाले प्रवासी… एका क्षणात आनंदाचा प्रवास झाला मृत्यूचा थरार! Video पाहा

Latest Marathi News Live Update : नागपूर विद्यापीठात प्र-कुलगुरू नियुक्ती पुन्हा लांबणीवर, बैठक अचानक स्थगित

Aryaman Birla: आयपीएल खेळाडू ते संघाची मालकी; रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचे संचालक आर्यमन बिर्ला यांचा प्रवास

Tamannaah Bhatia And Sidharth Malhotra: सिद्धार्थ मल्होत्रा तमन्ना भाटिया पुन्हा एकत्र, ‘व्वन’ चित्रपट २८ ऑगस्टला भेटीला!

Surgery Controversy: उलटी, तापातही शस्त्रक्रिया; प्राध्यापकाचा मृत्यू, साेलापूरात कॅशलेससाठी ऑपरेशनचा आरोप; महापालिका आरोग्य विभाग गप्प!

SCROLL FOR NEXT