Rahul Gandhi claims ED raid  
देश

Rahul Gandhi : 'चक्रव्यूह'बद्दलचे ते भाषण राहुल गांधींना भोवणार? स्वतःच पोस्ट करत सांगितला EDचा प्लॅन, म्हणाले "चहा अन् बिस्किटे..."

Rahul Gandhi Claims ED Raid Over Chakravyuh Speech : राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधी पोस्ट केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

रोहित कणसे

लोकसभेतील विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गाधी यांनी ईडीबद्दल खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या विरोधात ED छापेमारीची योजना आखत असल्याचे राहुल गांधी म्हणाले आहेत. त्यांनी दावा केला की, त्यांनी संसदेतील चक्रव्यूहाबद्दल केलेल्या भाषणानंतर ईडीकडून कारवाईची तयारी केली जात आहे. बजेट २०२४ बद्दल संसदेत भाषण करताना काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी कमळ चिन्हाचा उल्लेख करत २१ व्या शतकार नवीन चक्रव्यूह बनवले जात असल्याचे म्हटले होते.

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहीलं आहे की, 'एकंदरीत, २ पैकी एकाला माझे चक्रव्यूहाबद्दलचे भाषण आवडले नाही. ईडीच्या 'आतल्या लोकांनी' मला सांगितले की छापेमारी करण्याचे नियोजन केलं जातय. मी खुल्या मनाने वाट पाहतोय.' इतकेच नाही तर त्यांनी या पोस्टमध्ये ईडीला देखील टॅग केले आणि पुढे लिहिले की, 'चहा आणि बिस्किटे माझ्याकडून.'

भाषण काय केलं होतं?

राहुल गांधी त्यांच्या भाषणात म्हणाले होते की, हाजरो वर्षांपूर्वी कुरूक्षेत्रावर सहा जणांनी अभिमन्यूला चक्रव्यूहात अडकवले आणि त्यांची हत्या केली होती. मी थोडी रिसर्च केली आणि माहिती घेतली की, ‘चक्रव्यूहा’चे दुसरे नाव ‘पद्माव्यूह’ असेही आहे. कमळाच्या आकाराचे व्यूह असा याचा अर्थ आहे. पंतप्रधान हे चिन्ह आपल्या छातीवर लावतात.

पुढे राहुल गांधी म्हणाले की, जे अभिमन्यू सोबत केलं गेलं, ते भारत देशासोबत केलं जात आहे. युवा, शेतकरी, महिला, छोटे आणि मध्यम व्यापाऱ्यांसोबत केलं जात आङे. अभिमन्यूला सहा लोकांनी मारले होते. आज चक्रव्यूहाच्या केंद्रात सहा लोक आहेत. हे सहा लोक भारताला नियंत्रीत करतात. राहुल गांधींनी यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, सरसंघचालक मोहन भागवत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, उद्याोगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांची नावे घेतली होती. इतकेच नाही तर राहुल गांधींनी केंद्र सरकारकडून तयार करण्यात आलेल्या चक्रव्यूहमुळे कोट्यवधी लोकांना नुकसान होत असल्याचेही म्हटले होते.

यावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी काही लोक एक्सीडेंटल हिंदू आहेत आणि त्यांना महाभारताबद्दल माहिती देखील एक्सिडेंटल आहे असा टोला लगावला. तसेच त्यांनी सात चक्रव्यूह मोजून दाखवत काँग्रेसवर टीका करत काँग्रेस स्वतः चक्रव्यूव्ह असून यानींच देशाचे विभाजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Samman Nidhi : प्रतिक्षा संपली ! देशातील १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 'या' दिवशी जमा होणार २००० रुपये

Palghar : भाजपने पालघर साधू हत्याकांडाचे आरोप ज्यांच्यावर केले त्याच नेत्याला घेतलं पक्षात, प्रवेशाचा मोठा कार्यक्रम

Amravati:'पोटातल्या बाळासह गर्भवतीचा आणि इतर २ बालकांचा मृत्यू'; उपजिल्हा रुग्णालयातली धक्कादायक घटना..

Latest Marathi Breaking News : परंडा नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचा अर्ज दाखल; तानाजी सावंत उपस्थित

Kolhapur Weather: कोल्हापुरात मध्यरात्री तापमान १४ अंश सेल्सिअसवर! दाट धुक्यात हरवले शहर, नागरिकांनी पेटवल्या शेकोट्या

SCROLL FOR NEXT