Rahul Gandhi  Sakal
देश

Bharat Jodo Yatra : "त्याने मला पाहिलं आणि मी त्याला..."; राहुल गांधींनी सांगितला काश्मीरमधला किस्सा

राहुल गांधी ब्रिटनमधल्या केंब्रिज विद्यापीठात बोलत होते.

सकाळ डिजिटल टीम

Rahul Gandhi News : काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. केंब्रिज विद्यापीठात बोलत असताना राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यानचा किस्साही सांगितला आहे. यामध्ये त्यांनी काश्मीरमध्ये आपल्याला एक दहशतवादी सामोरा आल्याचंही सांगितलं आहे.

राहुल गांधी म्हणाले,"जेव्हा मी यात्रा करत होतो. तेव्हा मला सांगितलं गेलं होतं की तुम्हाला मारलं जाऊ शकतं. पण तरीही आम्ही यात्रा करत आहोत. तेवढ्यात एक व्यक्ती मला म्हणाला की मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा मला सुरक्षारक्षकांनी सांगितलं होतं की तुम्ही असं करू नका, लोकांना जवळ बोलवू नका. पण मी तरीही त्याला बोलावलं, ती व्यक्ती माझ्या जवळ आली."

राहुल गांधी पुढे म्हणाले, "त्या व्यक्तीने मला विचारलं की तुम्ही खरंच आमच्या समस्या ऐकायला आला आहात का? मी म्हणालो, हो. त्यानंतर आम्ही एकत्र पुढे चालू लागलो. त्या व्यक्तीने मला एका दिशेला पाहायला सांगितलं. मी तिकडे पाहिलं. त्यानंतर त्या व्यक्तीने सांगितलं की ते दहशतवादी आहेत. खरंतर मी अशा वातावरणात होतो की जिथं दहशतवाद्यांनी मला मारून टाकायला हवं होतं. मी त्याला बघत होतो, तो मला बघत होता. मला वाटत होतं की तो मला मारून टाकेल. पण काहीच झालं नाही. मी त्याला बघत राहतो, तोही मला बघत राहतो आणि आम्ही पुढे निघून जातो."

"असं का झालं? असं नाही की त्यांच्याकडे ताकद नाहीये. असं यासाठी झालं की मी त्यांचं म्हणणं ऐकायला आलो होतो. मी कोणत्याही हिंसेसोबत आलो नव्हतो आणि खूप सारे लोक हे पाहत देखील होते", असंही राहुल गांधी पुढे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT