Rahul Gandhi On Image Esakal
देश

Rahul Gandhi Disqualified: गांधींची खासदारकी रद्द झाल्याची दोन देशांनी घेतली दखल; अमेरिकेपाठोपाठ आता...

दोन दिवसांपूर्वी अमेरिकेने या प्रकरणी नाराजी व्यक्त केली होती.

सकाळ डिजिटल टीम

Rahul Gandhi Disqualified: राहुल गांधींना सुनावलेली शिक्षा, खासदारकी रद्द होणं यावरुन देशातलं वातावरण तापलं आहे.देशभरात सर्वच पक्षांकडून या गोष्टींवर भाष्य केलं जात असतानाच इतर देशांचंही या राहुल गांधी प्रकरणाकडे लक्ष आहे. अमेरिकेनंतर आता जर्मनीनेही या प्रकरणी भाष्य केलं आहे.

अमेरिकेने दोन दिवसांपूर्वी या प्रकरणावरुन नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता जर्मनीने आपली भूमिका मांडली आहे. जर्मनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, काँग्रेस नेते राहुल गांधींवर झालेल्या कारवाईची आम्ही दखल घेतली आहे. आमच्या माहितीनुसार, राहुल गांधी याबद्दल पुनर्विचार याचिका दाखल कऱणार आहे. त्यानंतर ही कारवाई योग्य की अयोग्य हे समोर येईलच.

आमचं या प्रकरणाकडे लक्ष असेल, राहुल गांधींवर कारवाई करताना लोकशाहीची मूलभूत तत्वं पाळली पाहिजेत, अशी अपेक्षा जर्मनीने व्यक्त केली आहे.

काय आहे प्रकरण?

राहुल गांधी यांनी २०१९ साली एका सभेत मोदी आडनावावरुन एक विधान केलं होतं. यामध्ये चोरी आडनावाचे सगळेच चोर असतात का? असं राहुल गांधी म्हणाले होते.

त्यामुळे ते अडचणीत आले होते. त्यानंतर सूरत कोर्टाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर लगेचच लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra CET Percentile Scam : महाराष्ट्रात CET पर्सेंटाइल वाढवून देण्याचा घोटाळा?; चौकशी होण्याची शक्यता

Pimpri Rain: मुसळधार पावसाने पवना धरण ९६ टक्क्यांवर; आंद्रा शंभर टक्के भरले, पिंपरी परिसरात मुसळधार, तीन गावांचा संपर्क तुटला

Latest Live Updates Marathi : : जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरूंची बस रस्त्यावरून थेट घरावर कोसळली; ३९ जण जखमी

Kalsubai Harishchandragad Sanctuary : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! भंडारदरा, कळसूबाई अन् हरिश्चंद्रगडावर जाणाऱ्यांचा प्लॅन फसणार; 'या' कारणामुळे ट्रेकिंगवर बंदी

Shooting World Cup: भारताच्या ईशा सिंगची सुवर्णपदकावर मोहर, तर मनू भाकरला ब्राँझपदक

SCROLL FOR NEXT