rahul gandhi sakal
देश

'राफेल'बाबत लढण्यासाठी राहुल गांधींनी दिला नवा मंत्र, म्हणाले, "मेरे कांग्रेस साथियों..."

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राफेलप्रकरणी फ्रान्समधील मासिक मीडियापार्ट मधील एका लेखामध्ये खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. या खुलाशानंतर राफेल प्रश्नावरुन पुन्हा एकदा रणकंदन माजलं आहे. काँग्रेसने पुन्हा एकदा राफेलच्या व्यवहाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी आरोप केलाय की राफेच्या व्यवहारामध्ये मोठा घोटाळा झाला आहे. या व्यवहारामध्ये भष्ट्राचार झाला असून त्यातील कमीशन कुणाला मिळाली, याबाबतचा तपास करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

याबाबत आता ट्विट करत राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना न थकता लढण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटलंय की, जर पावलोपावली सत्याची साथ असेल तर काळजी कशाची? माझ्या काँग्रेसच्या साथींनो, भ्रष्ट केंद्र सरकारच्या विरोधात अशाच प्रकारे लढत रहा. थांबू नका, थकू नका आणि घाबरु नका! असंही त्यांनी म्हटलंय.

पवन खेडा यांनी म्हटलंय की, भाजपने इतक्या लवकर ही डील केली आहे की, टेंडरशिवायच 526 कोटींचा सौदा 1600 कोटींमध्ये निश्चित झाला. देशातील हा सर्वांत मोठा संरक्षण घोटाळा असल्याचंही त्यांनी म्हटलं. यावर आता भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसवरच पलटवार केला आहे. त्यांनी या रिपोर्टमधील एका मध्यस्थ्याच्या नावाचा उल्लेख करताना म्हटलं की, आश्चर्याची बाब ही आहे की ज्या मध्यस्थ्याचं नाव ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात समोर आलं होतं, त्याचंच नाव राफेल डीलमध्येही आलंय.

पात्रांनी म्हटलंय की, राफेलचा विषय हा मोठ्या घोट्याळ्याचा विषय असून हे संपूर्ण प्रकरण सन २००७ ते २०१२ दरम्यान घडलं आहे. या काळात लाचखोरीचा प्रयत्न झाला आहे. यामध्ये मध्यस्थाचं नावही समोर आलं आहे. सुषेण गुप्ता असं याचं नाव आहे. हा कोणी नवा खेळाडू नसून जुनाच खेळाडू आहे. याला ऑगस्टा वेस्टलँड केसमधील किंगपिन मानलं जात आहे. या प्रकरणात मध्यस्थ असलेली व्यक्ती सन २००७ ते २०१२ मध्ये राफेल डीलमधील लाचप्रकरणातील मध्यस्थ होता. जास्त योगायोग व्हायला लागले की ते सत्यही असू शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT