rahul gandhi.jpg 
देश

असंघटित क्षेत्र संपवण्याचा मोदी सरकारचा डाव; राहुल गांधींचा गंभीर आरोप

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- ‘‘मोदी सरकारने ९० टक्के रोजगारनिर्मिती करणाऱ्या असंघटित क्षेत्राचा नायनाट करण्याचा विडा उचलला आहे आणि त्यांच्या या कारस्थानाविरुद्ध लढा देण्याची वेळ आली आहे,’’ असे आवाहन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी ट्‌वीटरद्वारे केले. ‘अर्थव्यवस्था की बात’ या शीर्षकाने ते आर्थिक मुद्यांवर जनतेशी संवाद साधणार आहेत व त्यातील हे पहिले ट्विट आहे. 

‘मन की बात’ला लोकांची मिळेना साथ; गेल्या 6 वर्षांत पहिल्यांदाच अशी वेळ

राहुल गांधी यांनी असंघटित किंवा अनौपचारिक क्षेत्रावर योजनाबद्ध रीतीने मोदी सरकारतर्फे होणाऱ्या आक्रमणाचा आरोप करताना नोटबंदी, ‘जीएसटी’ची सदोष अंमलबजावणी आणि लॉकडाउन यांचा उल्लेख ट्विटमध्ये केला आहे. या तीन निर्णयांमुळे देशाची आर्थिक स्थिती बिकट झाल्याचेही म्हटले आहे. २००८ मध्ये जगभरात मंदीची लाट आली होती, परंतु भारतावर त्याचा फारसा परिणाम झाला नव्हता याचा हवाला देत राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की याचे कारण तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांना विचारले असता त्यांनी ज्या देशाचे असंघटित क्षेत्र मजबूत आहे त्या अर्थव्यवस्थेवर कोणतीही आर्थिक उलथापालथ परिणाम करू शकणार नाही, असे सांगितले होते. परंतु हे क्षेत्रच नष्ट करण्याचा डाव खेळला जात आहे. 

प्रशांत भूषण १ रुपयाचा दंड भरणार? ट्विट करुन दिलाय संकेत

सामान्यांचा पैसा हडप करण्याचा प्रयत्न 

असंघटित क्षेत्रातच खऱ्या अर्थाने पैसा खेळता असतो. या क्षेत्रातच लाखो-कोट्यवधी रुपयांच्या उलाढाली होतात. परंतु त्या विखुरलेल्या स्वरूपात असतात. संघटित क्षेत्रात मूठभरांतर्फेच उलाढाली होत असल्याने ते लक्षात येतात. आता असंघटित क्षेत्रातील या अमाप पैशावर मोदी सरकारची नजर गेलेली आहे आणि तो पैसा या सामान्य लोकांकडून कसा हडप करता येईल, यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत असा आरोप करून राहुल गांधी यांनी षड्‌यंत्राविरुद्ध लढा देण्याची वेळ आल्याचे आवाहन सामान्य लोकांना व असंघटित क्षेत्राला केले. 

लॉकडाउनची योजनाबद्ध चाल 

नोटबंदी, सदोष जीएसटी आणि लॉकडाउनमुळे या क्षेत्राची पुरती वासलात लागली व परिणामी बेकारी प्रचंड प्रमाणात वाढलेली दिसून येते. लॉकडाउनचा निर्णय अचानक नव्हता तर असंघटित क्षेत्र संपविण्यासाठीची ती योजनाबद्ध चाल होती, असा गंभीर आरोपही राहुल गांधी यांना ट्विटमध्ये केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirur Accident : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात, रांजणगाव गणपती येथे आरामबसची दोन वाहनांना धडक; १६ प्रवासी जखमी, चार गंभीर

Prakash Abitkar : कोल्हापूरकरांसाठी दिलासा! अखेर गुळगुळीत रस्ते मिळणार; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ४०९ कोटींचा प्रस्ताव केला सादर

"तुमचे views वाढवण्यासाठी चुकीच्या बातम्या छापू नका" मालिका सोडण्याच्या चर्चांवरून तेजश्रीने माध्यमांना झाप

Satara Doctor Case : फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण - उपसभापति नीलम गोऱ्हेंची कठोर भूमिका, पोलिसांना चार्जशीट दाखल करण्याचे निर्देश

Latest Marathi News Live Update : डॉ. संपदा मुंडे प्रकरणात जाणीवपूर्वक चारित्र्यहनन केलं जात आहे - रोहित पवार

SCROLL FOR NEXT