New Parliament Building Inauguration Sakal
देश

New Parliament Building : '..ते उद्घाटनाला राज्याभिषेक समजू लागले', राहुल गांधींचा नेमक्या जागेवर घाव

संतोष कानडे

New Parliament Building Inauguration : नवीन संसद भवनाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. उद्घाटनाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाच्या विकासाच्या प्रवासात काही क्षण अमर होतात. 28 मे हा असाच एक दिवस आहे. ते म्हणाले की ही केवळ एक इमारत नाही तर 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे.

या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. पंतप्रधानांऐवजी राष्ट्रपतींनी नवीन संसद भवनाचं उद्घाटन करावं, असं विरोधी पक्षांच्या नेत्यांचं म्हणणं होतं. परंतु केंद्र सरकारने कुणाचंही न ऐकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते संसद भवनाचं उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला.

या उद्घाटन सोहळ्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर नेमक्या शब्दांत टीका केली आहे. 'संसद लोकांचा आवाज आहे! पंतप्रधान संसद भवनाच्या उद्घाटनाला राज्याभिषेक समजत आहेत' असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. आज संपन्न झालेला उद्घाटन सोहळा पाहिला तर धार्मिक मंत्रोच्चार आणि हिंदू परंपरेनुसार विधिवत पूजन करण्यात आलं. लोकसभेत 'सेंगोल' स्थापित करुन त्याला सामर्थ्याचा राजदंड म्हणून स्वीकारण्यात आलं. याच अनुषंगाने राहुल गांधी टांनी टीका करत हे केवळ संसदेचं उद्घाटन होतं, पंतप्रधानांनी त्याला राज्याभिषेक समजलं आहे, अशी टीका केली आहे.

पंतप्रधानांच्या भाषणातील मुद्दे

  • नवी संसद आत्मनिर्भर भारताची साक्ष देईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. यातून भारताच्या निर्धाराचा संदेश जगाला मिळतो.

  • संसद आपल्या लोकशाहीचे मंदिर आहे. हे नवे संसद भवन नियोजनाला वास्तवाशी, धोरणाला बांधकामाशी, इच्छाशक्तीशी कृतीशक्तीशी, संकल्पाला यशाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरेल.

  • ही नवीन इमारत आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने पूर्ण करण्याचे माध्यम बनेल. ही नवीन इमारत स्वावलंबी भारताचा सूर्योदय पाहणार आहे.

  • या नवीन इमारतीमुळे विकसित भारताच्या संकल्पांची पूर्तता होणार आहे. नव्या-जुन्याच्या सहजीवनासाठीही ही नवी इमारत आदर्श ठरणार आहे.

  • ते म्हणाले की, जेव्हा भारत पुढे जातो तेव्हा जग पुढे जाते. संसदेची ही नवीन इमारत भारताच्या विकासातून जगाच्या विकासाची हाक देईल.

  • नव्या वाटांवर चालल्यानेच नवे आदर्श निर्माण होतात, असे ते म्हणाले. आज नवा भारत नवीन मार्ग तयार करत आहे आणि नवीन ध्येये निश्चित करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India Turbulence Incident : एअर इंडिया फुकेत-दिल्ली फ्लाईटच्या 'त्या' घटनेबाबत धकक्कादायक माहिती समोर; मुख्य पायलटने ओढला होता गांजा

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान T20I मालिका सप्टेंबरमध्ये होणार! ACB कडून तारखांबाबत मोठी अपडेट

Manoj Jarange Patil यांच्या डिफेंडर गाडीवरून नेमकी चर्चा काय?

धक्कादायक! सीलबंद शीतपेयाच्या बाटलीत आढळला केस, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; FDAकडे कारवाईची मागणी

Marathi News Live Updates : 'या' तारखेला होणार संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी

SCROLL FOR NEXT