Rahul-Gandhi on Lakhimpur violence
Rahul-Gandhi on Lakhimpur violence sakal
देश

भारत गवाह है! लखीमपूर प्रकरणी राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

सकाळ डिजिटल टीम

लखनौ : लखीमपूर खिरी (Lakhimpur Kheri Violence) येथे झालेल्या हिंसाचारात शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता उत्तर प्रदेश एसआयटीने (SIT) आरोपपत्र दाखल केलं असून गृहराज्य मंत्री अजय मिश्रा (Minister Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्राला मुख्य आरोपी केलं आहे. त्यावरूनच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

पाच हजार पानाच्या आरोपपत्रातील सत्य पूर्ण देशाने व्हिडिओच्या स्वरुपात पाहिलं आहे. तरीही मोदी सरकार आरोपींचा बचाव करत आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच सर्व देश या घटनेचा पुरावा असून गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना निलंबित करण्याची मागणी राहुल गांधींनी केली आहे.

लखीमपूर खिरीमध्ये ३ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना चिरडण्यात आले होते. या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. तर त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात आणखी चार जणांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला या प्रकरणी अटक करण्यात आली होती. आतापर्यंत जवळपास १३ जणांना अटक झाली आहे. पण, एसआयटीने १३ आरोपींविरोधातील अपघाताची कलमे हटवली आहेत. तसेच आशिष मिश्राला मुख्य आरोपी केलं आहे. त्याच्यावर हत्येचा प्रयत्न आणि एकत्र येऊन गुन्हा करणे इत्यादी कलमे लावण्यात आली आहेत.

एसआयटीने यापूर्वी हा हिंसाचार पूर्वनियोजित कट असल्याचा निष्कर्ष काढला होता. त्यावेळी देखील राहुल गांधींनी आक्रमक भूमिका घेतली होती. एसआयटीच्या अहवालानंतर काँग्रेसने सरकारवर हल्लाबोल करत दाखल करण्यात अहवालावर सभागृहात चर्चा व्हायला हवी, तसेच सरकारने केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT