Rahul Gandhi and Narendra Modi
Rahul Gandhi and Narendra Modi 
देश

Rahul Gandhi Reaction : खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधींची पहिलीच प्रतिक्रिया, 'काहीही झालं तरी...'

सकाळ डिजिटल टीम

Rahul Gandhi Reaction : राहुल गांधीची खासदारकी रद्द झाल्यानंतर आता पहिल्यांदाच त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यामध्ये त्यांनी आपण देशाचा आवाज म्हणून वेगवेगळ्या लढ्यात सहभागी होत आहोत. त्याच्यासाठी हवा तो संघर्ष करण्याची आपली तयारी आहे. आणि मी शेवटपर्यत त्याच्यासाठी लढेल असे राहुल यांनी म्हटले आहे.

राहुल यांनी त्या ट्विटमध्ये आपल्याबाबत जे काही झाले त्यासाठी हवी ती किंमत चुकवावी लागेल तरी तयार आहे. अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत. राहुल यांचे ते व्टिट व्हायरल झाल्यानंतर त्यावर शेकडो प्रतिक्रिया आल्या आहेत.

मोदी आडनावाच्या मानहानीप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरतमधील न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवले आणि २ वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधींवर करण्यात आलेल्या या कारवाईवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे यादरम्यान भाजपने मात्र भगवान के घर देर है, अंधेर नही अशी प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यावर वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर, कुणाल कामरा यांच्या नावाचा समावेश आहे.याशिवाय आणखी काही बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सुरतमधील सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांना जामीनही दिला होता. तसेच राहुल गांधी यांना उच्च न्यायालयात अपिल करण्यासाठी 30 दिवसांची मुदतही दिली होती. मात्र, त्यापूर्वीच राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे.

राहुल गांधी केरळमधील वायनाडमधून लोकसभेचे खासदार होते. 2004 मध्ये ते पहिल्यांदा अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते आणि 2019 पर्यंत ते तिथले खासदार होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अमेठीची त्यांची पारंपारिक जागा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी विरोधात गमावली, परंतु वायनाडमधून निवडणूक जिंकून त्यांची संसद सदस्यत्व कायम ठेवलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT