Congress leader Rahul Gandhi addressing a press conference amid the “H Files” controversy and fresh allegations of vote manipulation.

 

esakal

देश

Rahul Gandhi H Files : राहुल गांधींच्या 'एच फाइल्स'मधील मत चोरीच्या आरोपानंतर आता नवी अपडेट आली समोर!

Rahul Gandhi H Files controversy and vote theft allegations : मतदान कार्डावर त्या कथित मॉडेलचा फोटो असणाऱ्या मतदारानेच म्हटले मतचोरी झाली नाही; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Mayur Ratnaparkhe

New Update Emerges After Vote Theft Allegations : काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या "एच फाइल्स" प्रेझेंटेशनमध्ये दावा केला आहे की हरियाणात ब्राझिलियन मॉडेलच्या नावावर २२ मते नोंदली गेली आहेत. मॉडेलने तिचे नाव बदलून हरियाणात २२ मते टाकली. तिने कधी सीमा म्हणून, कधी स्वीटी म्हणून तर कधी सरस्वती म्हणून मतदान केले. काँग्रेस दावा करत आहे की या मॉडेलचे नाव मॅथियस फेरो आहे.

तर आता बिहारमधील निवडणुकीच्या वातावरणात  सोशल मीडियावर ब्राझिलियन मॉडेल असलेल्या मतदार ओळखपत्रावरून वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात इंडिया टुडेने यातील एक मतदार असलेल्या पिंकी यांचा  शोध घेतला आहे,  ज्यांच्या मतदार कार्डवर हा अजब फोटो छापला गेला होता. मात्र या दोन्ही कुटुंबांनी मतदान चोरीच्या आरोपांना स्पष्टपणे फेटाळले आहे.

मतदार पिंकी यांनी त्यांची बाजू मांडली व स्पष्टपणे सांगितले की त्यांनी स्वतः मतदान केले आणि कोणतीही मतदान चोरी झालेली नाही. एवढंच नाहीतर त्यांनी स्पष्ट केले की मतदार कार्डवरील चूक तिची नाही तर निवडणूक कार्यालयाची किंवा बीएलओची होती.

तसेच त्यांनी सांगितले की,  "मी २०२४ च्या निवडणुकीत माझ्या मतदार स्लिप आणि आधार कार्डचा वापर करून मतदान केले. चूक माझी नाही. जेव्हा पहिल्यांदा चूक आढळली तेव्हाच आम्ही दुरुस्तीसाठी अर्ज केला होता." तर पिंकीच्या कुटुंबातील सदस्यांनी मतचोरीचा आरोप हा प्रोपोगंडा असल्याचे म्हटले आणि सांगितले की, पिंकीने स्वत:च मतदान केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT