देश

'व्हॅक्सिन के साथ मोदी भी गायब'; राहुल गांधींची घणाघाती टीका

विनायक होगाडे

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचं (Corona) संकट दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली असून याबाबत आता केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. एकाबाजूला 18 ते 45 वयोगटातील लोकांच्या लसीकरणाची (VACCINATION) घोषणा केली असली तरी देशात लसीच्या प्रचंड तुटवड्यामुळे सध्या सावळा गोंधळ दिसून येतो आहे. या साऱ्या विदारक परिस्थितीवरुनच आता काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर (PM Modi) टीका केली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी टीका करत म्हटलंय की, लसीसोबतच पंतप्रधान देखील गायब झाले आहेत. राहुल गांधी यांनी या ट्विटमध्ये म्हटलयं की, लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबतच पंतप्रधान देखील गायब आहेत. उरलं आहे फक्त सेंट्रल विस्टा (Central Vista), औषधांवरील GST आणि पंतप्रधानांचे इकडचे-तिकडचे फोटो! (Rahul Gandhi's harsh criticism Modi also disappears along with Corona Vaccine)

एकाबाजूला कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली असताना दुसरीकडे रुग्णांना ऑक्सिजन मिळणे अवघड झालं आहे. लसीकरणासाठी कोविन ऍपवर कित्येकदा प्रयत्न करुनही रजिस्ट्रेशन होत नाहीये. काहींना ओटीपी मिळण्यात देखील अडचण येत आहे. जर लस उपलब्धच नव्हती तर 18 ते 45 वयोगटासाठी लसीकरणाची मोहिम खुली केलीच कशाला? असा सवाल जनसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. देशात इतका मोठा हाहाकार सुरु असताना सेंट्रल विस्टा प्रकल्पाचं मात्र काम सुरु आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी देखील दिसेनासे झाले आहेत. यावरुनच आता विरोधक आक्रमक होताना दिसत आहेत.

भारतात कोरोना वाढण्यामागील कारण WHO नं सांगितलं आहे. भारतात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढण्यामागे धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांत जमा झालेली गर्दी हे एक प्रमुख कारण असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनासंदर्भात जाहीर केलल्या साप्ताहिक अहवालातील माहितीमध्ये नमूद केले आहे. भारतात सध्याची ही विदारक परिस्थिती निर्माण होण्यामागे प्रमुख कारण म्हणून निवडणूकीच्या प्रचारसभांकडे तसेच कुंभमेळ्यांकडे बोट दाखवलं जात आहे. आणि आता एकप्रकारे आरोग्य संघटनेने यालाच दुजोरा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Restrictions: पुण्यात आज रात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी का? नेमकं कारण काय?

Kolhapur Student End Life : वडील, भावाने गाडीवरून कॉलेजला सोडलं नाही; चिडून थेट गळफासचं घेतला, कोल्हापुरातील घटनेनं खळबळ

Latest Marathi News Live Update : कांद्याला हमीभावासाठी शेतकऱ्यांचा संताप उसळला

रणवीर सिंह आता बॉलिवूडमध्ये काम करु शकणार नाही? ‘डॉन 3’ वादात रणवीर सिंह अडचणीत, FWICE ची मोठी कारवाई

Kolhapur कार-कंटेनरची धडक, २८ वर्षीय डॉक्टरचा जागीच मृत्यू; हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या दिवशीच काळाचा घाला

SCROLL FOR NEXT