Rahul Gandhi News esakal
देश

Rahul Gandhi : काय कमावलं? काय गमावलं? 'असा' आहे राहुल गांधींचा राजकीय प्रवास

२०१३ मध्ये राहुल गांधींकडे पक्षाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी पक्षासाठी सक्रीयपणे लोकांमध्ये उतरले होते. परंतु पक्षाला मोठ्या पराभवाचं तोंड बघावं लागलं.

संतोष कानडे

Congress Rahul Gandhi : अपुऱ्या संख्याबळामुळे मागच्या दहा वर्षांपासून काँग्रेसला विरोधी पक्षनेते पदाची संधी मिळाली नव्हती. मात्र यावेळी काँग्रेस आणि एकूणच इंडिया आघाडीच्या दमदार कामगिरीमुळे लोकसभेत काँग्रेसला विरोधी पक्षनेता मिळणार आहे.

काँग्रेसच्या बैठकीमध्ये राहुल गांधी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून तेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते होणार आहेत. काँग्रेसच्या संसदीय मंडाळाच्या झालेल्या बैठकीत खासदार राहुल गांधी यांची विरोधीपक्षनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. याची माहिती काँग्रेसचे महासचिव केसी वेनुगापाल यांनी दिली.

मंगळवारी रात्री काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर माहिती देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार केसी वेणुगोपाल म्हणाले की, या बैठकीत राहुल गांधी यांना सभागृहात विरोधी पक्षनेते बनवण्याबाबत चर्चा झाली. विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांची निवड करावी यासाठी हंगामी अध्यक्षांनाही पत्र लिहिले आहे.

२००४ मध्ये राजकारणात एण्ट्री

दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे पुत्र राहुल गांधींची सुरुवातीचं शिक्षण दिल्ली आणि देहराडून येथे झालं. सुरक्षेच्या कारणास्तव लहानपणीचा जास्तीत जास्त कालावधी त्यांचा घरातच गेला.

२००४ मध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने राजकीय जीवनात प्रवेश केला. अमेठी येथून लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा करुन त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. त्यावेळी राहुल गांधीनी बसपा उमेदवार चंद्र प्रकाश मिश्रा मटियारी यांना २ लाख ९० हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभूत केलं. त्यानंतर काँग्रेसच्या प्रत्येक बैठकीसाठी आणि निर्णयामध्ये राहुल गांधींचा सहभाग दिसून येऊ लागला.

२०१३ मध्ये पक्षामध्ये मोठी जबाबदारी

२०१३ मध्ये राहुल गांधींकडे पक्षाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी पक्षासाठी सक्रीयपणे लोकांमध्ये उतरले होते. परंतु पक्षाला मोठ्या पराभवाचं तोंड बघावं लागलं.

त्यानंतर २०१९ मध्येही पक्षाला यश मिळू शकलं नव्हतं. त्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधींनी अमेठीसह वायनाडमधून उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु अमेठीमधून त्यांना पराभूत व्हावं लागलं. तिथे भाजप उमेदवार स्मृती ईराणी यांचा ५५ हजार १२० मतांनी विजय झाला होता.

आता राहुल गांधी लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते होणार आहेत. एक मोठी आणि संवैधानिक जबाबदारी त्यांच्याकडे असणार आहे. या पदाचा मोठा इतिहास आहे. राहुल गांधी आपली भूमिका कशी पार पाडतात, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदींनी केलेल्या अचानक घोषणे बद्दल काय आहे शरद पवारांचे मत? केली मोठी भविष्यवाणी

Raj Thackeray criticism narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले 'भुर्दंड जनतेला का ?'

Korean Peninsula Tensions: किम जोंग यांची हत्या झाल्यास अण्वस्त्र हल्ला; उत्तर कोरियाने स्वीकारले नवे धोरण

IPL 2026 : दिल्लीने पंजाबला हरवलं, पण कर्णधार अक्षर पटेलला BCCI ने सुनावली शिक्षा; नेमकी काय झाली चूक?

Maharashtra Cost Cutting Rules : महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद

SCROLL FOR NEXT