Devdendra Fadnavis  Team eSakal
देश

राहुल गांधी संजय राऊतांचे नेते; 'त्या' भूमिकेवर फडणवीसांची टोला

ममता बॅनर्जी यांच्या तिसऱ्या आघाडीला शिवसेनेचं समर्थन नसल्याचं दिसत आहे.

सुधीर काकडे

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होण्याने तिसऱ्या आघाडीच्या चर्चांना उधान आलं आहे. त्यानंतर काँग्रेसशिवाय तिसऱ्या आघाडीच्या चर्चांवर आज शिवसेनेचे मुखपत्र ‘सामाना’ने अग्रलेखातून भाष्य केलं आहे. काँग्रेसला विरोध करणे म्हणजे भाजपचे हात बळकट करणे असं म्हणत काँग्रेसशिवाय (Congress) तिसऱ्या आघाडीवर सामनातून टीका करण्यात आली आहे. त्यावर आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

भाजपविरोधी आघाडीचं नेतृत्व करण्यासाठी ममता बॅनर्जी सध्या राष्ट्रीय राजकारणात सक्रीय झाल्याचं दिसतं आहे. त्यावर भाष्य करताना सामानामध्ये नेतृत्व करण्याचा अधिकार कुणाला याचं उत्तर वेळ देईल, सध्या भाजप विरोधात पर्याय उभं करणं महत्वाचं आहे असं म्हणत, काँग्रेसला विरोध करणाऱ्यांचा समाचार घेतला. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सामनाच्या संपादकांचे नेते आता बदलले असल्याचं सांगितलं. राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी हेच सामनाच्या संपादकांचे नेते असल्याचं ते म्हणाले.

औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या फडणवीस यांनी यावेळी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या राज्य सरकारवर देखील निशाणा साधला. एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे चुकीचे असल्याचे म्हणत चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, “दैवी अधिकारांचा घोळ!” या शीर्षकाखालील सामनाच्या अग्रलेखात ममता बॅनर्जींसह प्रशांत किशोर यांच्या वक्तव्याचा देखील समाचार घेतला आहे. युपीए नेतृत्वाचा दैवी अधिकार कुणाला हे येणारा काळ ठरवेल असे म्हणत या अग्रलेखातून काँग्रेस शिवाय तिसऱ्या आघाडीच्या मुद्याला विरोध केल्याचं दिसून येतंय. दैवी अधिकार कुणाला हे वेळ ठरवेल पण सध्या भाजप विरोधात पर्याय तर उभा करा असं आवाहन सर्व विरोधीपक्षांना या माध्यमातून करण्यात आलंय.

काँग्रेस आज कठीण काळातून जात आहे, मात्र उताराला लागलेली गाडी वर चढूच द्यायची नाही हा प्रयत्न करणे चुकीचे असल्याचे मत या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. तसेत काँग्रेसला घरचा आहेर देणाऱ्या जी-२३ नेत्यांचा समाचार घेताना, ज्या लोकांनी आयुष्यभर काँग्रेसकडून सुख, चैन, सत्ता उपभोगली तेच आता काँग्रेसचा गळा घोटता आहेत असा शाब्दिक हल्ला चढवण्यात आलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोंथा चक्रीवादळाने अरबी समुद्र खवळला, उरणमध्ये ३ बोटी भरकटल्या; 50 मच्छिमारांशी संपर्क तुटला

PAK vs SA : फुसका बार..! Babar Azam दोन चेंडूंत झाला गार; पुनरागमनाची फक्त हवा, पाकिस्तानी चाहत्यांना आलं रडू Video

Yami Gautam and Emraan Hashmi: यामी गौतम आणि इमरान हाश्मी पहिल्यांदाच एकत्र, ‘हक’मधून समाजाविरुद्ध लढणाऱ्या आईची कथा

Pune Crime : फळ विक्रेत्यासह दोघांवर हडपसरमध्ये शस्त्राने वार, एकाला अटक; साथीदारांविरुद्ध गुन्हा

Sanjay Shirsat : निवडणुकीपूर्वीच महापौरपदाचे बाशिंग! पालकमंत्री शिरसाट यांच्या पुत्राला शुभेच्छा देणारे शहरात झळकले होर्डिंग्ज

SCROLL FOR NEXT