Rahul Gandhi Letter to Twitter CEO Sakal
देश

'ट्विटरला सरकारचा...', राहुल गांधींचं Twitter च्या सीईओंना पत्र

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : ट्विटरला सरकारचा मोहरा बनू देऊ नका, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी म्हटलंय. तसेच माझं ट्विटर अकाऊंट कुठलंही वैध कारण न देता ब्लॉक करण्यात आलंय. मोदी सरकारच्या दबावाखाली येऊन ट्विटर हे करतंय, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. याबाबत त्यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल (Rahul Gandhi Letter To Twitter CEO) यांनी पत्र लिहिले आहे.

सरकारच्या काही धोरणांवर टीका-टीप्पणी केल्याचे काही व्हिडिओ आणि फोटो दडपण्यात आल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. या पत्रात त्यांनी काही डेटा विश्लेषण देखील दिले आहे. ट्विटर मोदी सरकारच्या दबावाखाली माझे फॉलोअर्स वाढू न देण्यासाठी प्रयत्न करतंय. ऑगस्ट २०२१ मध्ये माझं अकाऊंट कुठलंही कारण न देता ब्लॉक करण्यात आलं. त्यावेळी जितके फॉलोअर्स होते तितकेच आजही आहेत. अजून फॉलोअर्स वाढलेले नाहीत, असंही पत्रामध्ये म्हटलंय. याबाबत एडीटीव्हीनं वृत्त दिलं आहे.

राहुल गांधींनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबाचे फोटो ट्विट केल्यानं त्यांचं अकाऊंट वादात सापडलं होतं. तसेच पीडितेच्या कुटुंबीयांचा फोटो ट्विट करून त्यांनी कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यानंतर परत त्यांचं अकाऊंट एक आठवड्यासाठी ब्लॉक करण्यात आलं होतं. कृषी कायदे आणि सरकारच्या इतर धोरणाविरोधात वारंवार टीका करत असल्यानं ट्विटर सरकारच्या दबावाखाली येऊन माझ्या अकाऊंटवर कारवाई करत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या कार्यालयाचे डिजिटल कम्युनिकेशनचे प्रभारी, श्रीवत्स वायबी यांनी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले होते की, ट्विटरकडून आम्हाला देण्यात आलेलं स्पष्टीकरण समाधानकारक नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

SCROLL FOR NEXT