Rahul Gandhi Mallikarjun Kharge News Sakal
देश

Rahul Gandhi News: "...नाहीतर ते म्हणतील मी तुमच्या पाठीला नाक पुसतोय"; गांधींनी घेतला विरोधकांचा धसका

Rahul Gandhi News: राहुल गांधींना नुकतंच मोदींचा अवमान केल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Rahul Gandhi News: काँग्रेस खासदार राहुल गांधी सध्या चांगलेच चर्चेत आहेत. नुकतंच मोदींचा अवमान केल्याप्रकरणी कोर्टाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

त्यानंतर त्यांनी विरोधकांचा धसका घेतला की काय असं दिसत आहे. याचं कारण म्हणजे हा व्हिडीओ. या व्हिडीओ मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत राहुल गांधी दिसत आहेत. (Latest Marathi News)

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत होता. यामध्ये राहुल गांधी मल्लिकार्जुन खर्गे यांना मदत करत असल्याचं दिसत होतं.

विरोधकांनी या व्हिडीओत राहुल गांधी खर्गे यांच्या पाठीला नाक पुसत असल्याचा दावा केला. त्यावरुन आता राहुल गांधींनी भाजपाला खोचक टोला लगावला आहे. (Marathi Tajya Batmya)

खर्गे यांच्यासोबतचा आणखी एक व्हिडीओ आता समोर आला आहे. ज्यामध्ये राहुल गांधी खर्गेंना पायरी उतरण्यासाठी मदत करत आहेत.

त्यावेळी खर्गे यांना राहुल गांधी म्हणाले, "मी जर आत्ता तुम्हाला हात लावला, तर ते म्हणतील की मी तुमच्या पाठीला नाक पुसत आहे. तो व्हिडीओ पाहिला का? मी त्या दिवशी तुम्हाला मदत करत होतो, तेव्हा हे लोक म्हणाले की मी तुमच्या पाठीला नाक पुसतोय."

राहुल गांधी सध्या त्यांच्यावरच्या मानहानीच्या खटल्यामुळे संकटात सापडले आहेत. त्यांच्या खासदारकीवरही गदा येण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. काँग्रेस या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांनी सत्य हाच आपला देव असल्याचं सांगत या शिक्षेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार डळमळीत?, फुटण्यासाठी एका आमदाराला ३५ कोटींची ऑफर, तिघांना अटक

LPG Price Today: कमर्शियल LPG सिलेंडर 183 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता घरगुती गॅसचे दर जाहीर! पाहा तुमच्या शहरातील नवे भाव

Belgium vs Senegal : ३ मिनिटांत बाजी पलटली, बेल्जियमने ०-२ अशा पिछाडीवरून मॅच फिरवली; लढवय्या सेनेगलचा दुर्दैवी पराभव

Latest Marathi News Live Update : एल्फिन्स्टन ब्रिज परिसर जलमय, सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

SCROLL FOR NEXT