rahul gandhi  sakal
देश

Loksabha Rahul Gandhi : लोकसभेत बोलताना राहुल गांधींवर कॅमेरा का नव्हता? स्वतःच सांगितलं कारण

अविश्वाचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर राहुल गांधी यांनी माध्यमांशी संंवाद साधला आहे.

दत्ता लवांडे

नवी दिल्ली : देशातील विरोधकांच्या आघाडीने मोदी सरकारविरोधातील अविश्वासाचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. मणिपूरच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी विरोधकांच्या आघाडीने हा प्रस्ताव आणला होता. त्यानंतर राहुल गांधी यांनाही आपली खासदारकी परत मिळाली आणि त्यांनी सरकारला या प्रश्नावरून धारेवर धरले होते. दरम्यान, अविश्वास प्रस्तावार लोकसभेत त्यांचे भाषण सुरू असताना बराच वेळ त्यांच्यावर कॅमेरा का नव्हता या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं आहे.

राहुल गांधी यांनी बुधवारी अविश्वासाच्या प्रस्तावावरून सरकारला धारेवर धरणारे भाषण केले. जवळपास ३७ मिनिटांच्या भाषणामध्ये राहुल गांंधी यांना टीव्हीवर फक्त १४ मिनीटे दाखवण्यात आले. तर इतर वेळेत लोकसभा अध्यक्षांंना टीव्हीवर दाखवण्यात आलं असा आरोप काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी केला आहे. यावरून राहुल गांधी यांनी अखेर मौन सोडलं असून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

"कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझा चेहरा बघण्याची इच्छा नसेल. पण तरीही ते लोकसभेत माझ्या व्हिडिओच्या संदर्भात बोलतात. नेमकं काय आहे माहिती नाही पण ते माझा चेहरा टीव्हीवर बघू इच्छित नाहीत असं मला वाटतंय" अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदींवर ताशेरे ओढले आहेत.

मणिपूर मुद्द्यावर काय बोलले पंतप्रधान मोदी?

"मणिपूरच्या विकासासाठी आम्ही सक्षम आहोत. मणिपूरमध्ये अनेकांचे कुटुंब उध्वस्त झाले आहेत, त्या कुटुंबासोबत आम्ही आहोत. काँग्रेसमुळे नॉर्थ इस्ट भागाचा विकास होऊ शकला नाही, पंडीत नेहरू याला कारणीभूत आहेत" असं मोदी सभागृहात म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS DHONI: धोनीने CSK मध्ये २५ टक्के हिस्सा मागितला? अखेर फ्रँचायझीने मौन तोडलं; माहीच्या IPL भविष्याबाबतही मोठं अपडेट

धक्कादायक! चार महिन्यांत २०० हून अधिक कैद्यांना HIV ची लागण, सरकारकडून चौकशीचे आदेश

Bank Holiday: सप्टेंबरमध्ये बँका 14 दिवस बंद! सलग 4 दिवस बँकांना सुट्टी; महाराष्ट्रात किती दिवस बँका बंद?

UPI AutoPay मध्ये मोठा बदल; App बदललं तरी OTT, SIP आणि EMI चे पेमेंट राहणार सुरू

Marathi News Live Updates : उत्तराखंडमध्ये घडलेली घटना अत्यंत लज्जास्पद आहे - पृथ्वीराज चव्हाण

SCROLL FOR NEXT