Rahul Gandhi  esakal
देश

Rahul Gandhi : ''मी सहमत नसलो तरी 'त्यांचं' ऐकतो'', राहुल गांधींनी केला मोठा खुलासा

नागपूरमध्ये राहुल गांधींनी काँग्रेस आणि भाजप या पक्षांमधला फरक सांगितला.. देशात हुकूमशाही सुरु असल्याची टीका त्यांनी केली.

संतोष कानडे

नागपूरः काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये नागपूरमध्ये काँग्रेसचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित सभेला संबोधित करताना राहुल गांधींनी काँग्रेस आणि भाजप या पक्षांमधला फरक सांगितला आणि देशात हुकूमशाही सुरु असल्याची टीका केली.

राहुल गांधी म्हणाले की, मोदी यांची विचारधारा राजेशाही आहे. काँग्रेस पक्षामध्ये एक लहान कार्यकर्ता कोणत्याही नेत्याला टोकू शकतो.. मीही मी त्यांचं ऐकतो, त्यांचा आदर करतो.. भलेही मी त्यांच्याशी मताशी सहमत नसेल परंतु मी त्यांचं ऐकतो; असं म्हणत त्यांनी दोन्ही पक्षांमधला फरक विषद केला. भाजपमध्ये कार्यकर्त्यांची गुलामगिरी सुरु असल्याचाही आरोप त्यांनी केला.

काय म्हणाले राहुल गांधी?

''लोक म्हणतात काँग्रेस ने काय केले? स्वातंत्र्यापूर्वी देशामध्ये 500 ते 600 राजे होते.. इंग्रज होते. देशातील लोकांना कुठलाच अधिकार नव्हता, गरीब व्यक्तीची जमीन आवडली तर राजा घेत होता. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जनतेला अधिकार दिले, या देशामध्ये लोकशाही व्यवस्था प्रस्थापित केली.''

''संघाचे लोक संविधानविरोधी''

राहुल गांधी पुढे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक संविधानविरोधी आहेत. ते तिरंग्याला सलामी देत नव्हते, मात्र आपल्याला सर्व अधिकार संविधानाच्या माध्यमातून मिळाले आहेत. सर्वांना एक मत देण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे, याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे.

गांधी म्हणाले, मीडियाला पाहून घ्या.. लोकशाहीची सेवा करत आहेत, असं वाटतं का? मीडियावाल्यांना विचारा, मनात जे आहे ते मीडियावर बोलू शकत नाहीत. दुसरीकडे सीबीआय आणि ईडीचा दबाव आहेच. त्यामुळे देशातील जनतेला शक्ती देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. युवकांना व्हिजन देण्याचं काम काँग्रेसने केल्याचा दावा राहुल गांधींनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT