Rahul Gandhi Video esakal
देश

Rahul Gandhi : राजीव गांधींप्रमाणेच राहुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षेत होणार वाढ, धमकीचं महाराष्ट्र कनेक्शन काय?

Rahul Gandhi Marathi News : दिल्लीतल्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार राहुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे. याबाबचे इनपुट पोलिसांना मिळाले आहेत. त्यानंतर राहुल यांच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आलीय.

संतोष कानडे

Rahul Gandhi Marathi News : दिल्लीतल्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार राहुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे. याबाबचे इनपुट पोलिसांना मिळाले आहेत. त्यानंतर राहुल यांच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आलीय.

महाराष्ट्रातल्या नाशिक पोलिसांना याबाबत इनपुट मिळाले आहेत. राहुल गांधींना त्यांचे वडील राजीव गांधींप्रमाणे बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आलीय. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान त्यांच्यावर बॉम्बहल्ला होईल, अशी माहिती पोलिसांना देण्यात आली.

धमकीच्या इनपुटनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने राहुल गांधींच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवली आहे. सोबतच दिल्ली पोलिस, युपी आणि मध्य प्रदेश पोलिसांना राहुल गांधींच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सध्या राहुल गांधींना झेड प्लस सुरक्षा देण्यात आलेली असून २ मार्च रोजी त्यांची यात्रा मध्य प्रदेशात प्रवेश करत आहे.

'अमर उजाला'ने दिलेल्या वृत्तानुसार दिल्ली पोलिसातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर २४ अकबर रोड येथील राहुल गांधींच्या निवासस्थानी सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे. त्यांच्या घराच्या परिसरात पोलिस गस्त वाढवण्यात आलेली असून साध्या वेशातील पोलिस तैनात करण्यात आलेले आहेत.

राहुल गांधी यांना सध्या झेड प्लस सुरक्षा देण्यात आलेली आहे. त्यामध्ये संबंधित व्यक्तीसाठी १० पेक्षा जास्त एनएसजी कमांडे आणि पोलिस कर्मचाऱ्यांसह ५५ जवान तैनात असतात. सुरक्षा व्यवस्थेमधले कमांडो २४ तास डोळ्यात तेल घालून सुरक्षा पुरवत असतात. प्रत्येक कमांडो मार्शल आर्टचा स्पेशालिस्ट असतो.

दरम्यान, राहुल गांधींना धमकी देणारा नाशिक येथील एक मनोरुग्ण असल्याचं समोर येत आहे. याबाबत अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT